esakal | इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर खेळाडू उतरणार ऑलिम्पिकच्या मैदानात
sakal

बोलून बातमी शोधा

Laurel Hubbard

पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर खेळाडू उतरणार ऑलिम्पिकच्या मैदानात

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020: यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नवा इतिहास घडणार आहे. पहिल्यांदाच वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर (Transgender) खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहे. न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने नुकतेच वेटलिफ्टर लॉरेल हबार्ड (Laurel Hubbard) महिलांच्या +87 किलो वजनी गटातून स्पर्धेत सहभागी होणार असल्याची पुष्टी केलीये. लॉरेल हबार्ड ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्सजेंडर (Transgender) खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी 2013 मध्ये हबार्डने पुरुष गटातून स्पर्धेत भाग घेतला होता.

2015 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (International Olympic Committee) नियमात बदल केला होता. त्यानुसार ट्रान्सजेंडर अ‍ॅथलीट्सला टेस्टोस्टेरॉनचे प्रमाणानुसार महिला गटात खेळण्याला परवानगी देण्यात आली होती. न्यूझीलंडच्या अ‍ॅथलीट्सला याचा फायदा होईल. आणि तिच्या नावे नव्या इतिहासाची नोंद होईल. न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने निवेदनाच्या माध्यमातून सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

हेही वाचा: WTC INDvsNZ : रिझर्व्ह डे संदर्भात ICC ने घेतला मोठा निर्णय!

न्यूझीलंड ऑलिम्पिक समिती आणि अन्य लोकांकडून मिळालेल्या समर्थनाबद्दल हबार्डने देखील आभार मानले आहेत. 2017 मध्ये झालेली जागतिक स्पर्धेत रौप्य आणि सामोआ येथील पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत होबार्डने सुवर्णपदकाची कमाई केली. 2018 मध्ये राष्ट्रकूल स्पर्धेत हाताच्या दुखापतीमुळे तिचे करियर संपुष्टात येण्याची भीतीही निर्माण झाली होती. यासंदर्भात हबार्ट म्हणते की, "तीन वर्षांपूर्वी राष्ट्रकूल स्पर्धेत हाताला दुखापत झाली. दुखापतीतून सावरणे कठीण होते. हा करियरचा शेवट असल्याचे भीती मनात निर्माण झाली होती. पण तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे नवी उमेद मिळाली, असे हबार्डने म्हटले आहे.

हेही वाचा: WTC INDvsNZ : वातावरणाची 'कसोटी'; चौथा दिवसही पावसाचा

वयाच्या 35 व्या वर्षी हबार्डमध्ये ट्रान्सजेंडरचे बदल झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ट्रान्स अ‍ॅथलिट आणि योग्य स्पर्धेसाठीच्या नियमांच्या सर्व आवश्यकता पूर्तता केल्यानंतर तिचा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग सुकर झालाय. वेटलिफ्टिंगमध्ये सहभागी निश्चितच होताच इतिहास घडवणाऱ्या हबार्डकडून लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ती आगामी स्पर्धेत घवघवीत यश मिळवेल, अशा विश्वास न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने व्यक्त केलाय.

loading image