INDvsNZ : न्युझीलंडने केली धावांची बरसात

Newzealand scores 203 against India
Newzealand scores 203 against India

ऑकलंड : कॉलीन मुन्रो, केन विल्यम्सन आणि रॉस टेलरने आक्रमक अर्धशतके करून न्युझिलंडला प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 203चा धावफलक उभारून द्यायला मदत केली. जसप्रीत बुमरा आणि युझवेंद्र चहलने टिच्चून मारा केल्याने धावफलकाने अजून उंची गाठली नाही. ईडन पार्कच्या छोट्या आकाराच्या मैदानावर विजयाकरता 204 धावांचा पाठलाग करणे भारतीय संघाकरता आव्हानात्मक असले तरी अशक्य नक्कीच नाही.

नाणेफेक जिंकून विराट कोहलीने मैदान आणि खेळपट्टीचा अंदाज यावा म्हणून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. ईडन पार्कची खेळपट्टी चांगली आहेच वर त्याच्या सीमारेषा चांगल्याच जवळ असल्याचा फटका गोलंदाजांना बसणार याचा अंदाज खेळ चालू झाल्यावर लगेच यायला लागला. मार्टीन गुपटील आणि कॉलीन मनरो यांनी मनमुराद फटकेबाजी चालू केली. गोलंदाजाच्या मागची सीमारेषा खूप जवळ असल्याने तिथे मारलेले फटके 6 धावा देऊ लागले. खास करून दोनही फलंदाजांनी शार्दूल ठाकूरला लक्ष केले.

क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा असलेल्या 6 षटकात 68 धावा बरसल्या. शिवम दुबेने सलामीची भागीदारी तोडली जेव्हा गुपटील हुकचा फटका मारताना रोहित शर्माकडे झेल देऊन परतला. कप्तान विल्यमसनने जम बसवायला थोडे चेंडू घेतले आणि त्यानंतर 4 चौकार - 4 षटकार ठोकत 26 चेंडूत अर्धशतकी खेळी उभारली. मनरोही अर्धशतक करून गेला.

चहल आणि शिवम दुबेने मधल्या षटकात चांगला मारा केल्याने भरधाव पळत असणार्‍या धावगतीला थोडा ब्रेक लागला. शेवटच्या षटकात रॉस टेलरने अनुभवाचा फायदा काय असतो हे अर्धशतक करून सिद्ध केले. शेवटच्या षटकात भारतीय संघाच्या पोटात गोळा आला जेव्हा जसप्रीत बुमराचा डावा घोटा दुखावला. सुदैवाने बुमराने ते षटक पूर्ण करून दुखापत गंभीर नसल्याचे दाखवले आणि कोहलीने सुटकेचा नि:श्वास टाकला.

20 षटकांचा खेळ संपला तेव्हा रॉस टेलर 54 धावांवर नाबाद परतला आणि न्युझिलंडने 5 बाद 203 धावा उभारल्या होत्या. ऑकलंडचे क्रिकेटप्रेमी प्रेक्षक काम संपवून दुसरा डावाचा खेळ बघायला मैदानावर येणार ते भारतीय संघाचा 204 धावांचा पाठलाग बघायला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com