esakal | विराट राहुलला म्हणाला 'ग्लोव्ह्ज घाल' अन् रिषभ पंत राहिला 'बेंचवर'
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Virat-Pant

दुसरीकडे डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीने ग्रस्त असल्याने समतोल संघ राखण्याकडे आमचा कल आहे. त्यामुळे संघात आणखी एखाद्या खेळाडूला संधी दिली जाईल.

विराट राहुलला म्हणाला 'ग्लोव्ह्ज घाल' अन् रिषभ पंत राहिला 'बेंचवर'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ऑकलंड : सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. भारत-न्यूझीलंडमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार असून शुक्रवारी (ता.24) पहिला टी-20 सामना होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर 'मेन इन ब्लू' मैदानात सरावासाठी उतरलेले पाहायला मिळाले. ऑकलंडमधील मैदानावर गुरुवारी (ता.23) दोन्ही संघांनी कसून सराव केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मालिकेच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. आणि त्याने संघाच्या तयारीबद्दल माध्यमांना माहिती दिली. त्यावेळी त्याने केलेल्या एका विधानामुळे विकेटकीपर रिषभ पंतची काळजी वाढली आहे.  

- INDvsNZ : विराट म्हणतो, बदला या शब्दाला थारा नाही

विराट म्हणाला...

'ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत राहुलने विकेटकीपरची चांगली भूमिका बजावली. त्याच्या रुपाने टीम इंडियाला बॅट्समन आणि विकेटकीपर म्हणून चांगला पर्याय मिळाला आहे. जर तो अशीच कामगिरी करत राहिला तर त्याच्याकडेच विकेटकीपिंगची जबाबदारी कायम राहिल,' असे म्हणत रिषभला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. 

- INDvsNZ : 'गब्बर'ची जागा भरून काढण्याची जबाबदारी 'या' दोघांवर; न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर!

दुसरीकडे डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीने ग्रस्त असल्याने समतोल संघ राखण्याकडे आमचा कल आहे. त्यामुळे संघात आणखी एखाद्या खेळाडूला संधी दिली जाईल. जेणेकरून राहुल खालच्या क्रमांकावर जोरदार बॅटिंग करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात हे सगळ्यांनी पाहिलं आहे. 

दरम्यान, गुरुवारी राहुल मैदानात हॅण्ड ग्लोव्ह्ज घालूनच उतरला होता. त्याने स्टंपमागे विकेटकीपिंगचा जोरदार सरावही केला. याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. भारतीय गोलंदाजीची भिस्त आपल्या खांद्यावर घेणारा जसप्रित बुमरा आणि नवदीप सैनीने यावेळी गोलंदाजीचा सराव केला. तर दुसरीकडे हिटमॅन रोहित शर्मा, कॅप्टन विराट कोहलीने नेटमध्ये चांगला घाम गाळलेला दिसून आला.

- INDvsNZ : टीम इंडियाचे टचडाऊन न्यूझीलंड! पाहा फोटो

loading image