Neymar retires from international football
esakal
Neymar retirement after Brazil World Cup exit: ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेयमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. ब्राझीलला २०२६ फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ मध्ये सोमवारी नॉर्वेकडून २-१ ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ३४ वर्षीय फॉरवर्डने सामना संपताच काही क्षणांतच आपला निर्णय जाहीर केला. त्याने 'सेलेसाओ' संघासोबतच्या आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.