esakal | IPL Record : एका सीझनमध्ये 4 वेळा झिरोवर बाद झालेले 5 हिरो!

बोलून बातमी शोधा

IPL Record

IPL Record : एका सीझनमध्ये 4 वेळा झिरोवर बाद झालेले 5 हिरो!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Punjab vs Bangalore, 26th Match Record : अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाचे दोन गडी शून्यावर बाद झाले. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवातही खराब झाली. मॅक्सवेलला ब्रारने खातेही उघडू दिले नाही. पंजाबकडून निकोलस पूरन आणि शाहरुख खान खाते उघडण्यात अपयशी ठरले. निकोलस पूरन याच्या नावे नकोसा विक्रम झाला. तो सात सामन्यातील 4 सामन्यात शून्यावर बाद झालाय. आयपीएलच्या एका हंगामात चार वेळा शून्यावर बाद होणारा पूरन हा पाचवा फलंदाज ठरलाय.

हेही वाचा: IPL 2021: राहुलने दाखवला क्लास; RCB विरुद्ध खास रेकॉर्ड

2009 च्या हंगामात पहिल्यांदा हर्षल गिब्जवर अशी नामुष्की ओढावली होती. डेक्कन चार्जर्स (सध्याच्या सनरायझर्स हैदराबाद) संघाकडून खेळताना तो 4 वेळा शून्यावर बाद झाला होता. पुणे वॉरियर्सकडून खेळणारा भारतीय क्रिकेटर मिथून मनहास हा 2011 च्या हंगामात 4 वेळा शून्यावर बाद झाला होता. पुणे वॉरियर्सकडून खेणारा मनिष पांड्ये देखील 2012 च्या हंगामात 4 वेळा शून्यावर बाद झाला होता.

युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत शिखर धवनवर ही नामुष्की ओढावली होती. दिल्ली कॅपिटल्सचा संघ या हंगामात फायनलपर्यंत पोहचला होता. शिखर धवनने संघासाठी बहुमूल्य योगदानही दिले. पण चार सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. त्याच्यानंतर आता निकोलस पूरन या यादीत सामील झालाय. डेविड मलानसारखा जगातील सर्वोत्तम टी-20 प्लेयर संघात असताना पंजाब संघ व्यवस्थापन सातत्याने निकोलस पूरनवर विश्वास टाकत आहे. पण त्याने हा विश्वास निर्थक ठरवलाय.