
निखत म्हणते, सलमान इतरांसाठी भाईजान माझ्यासाठी 'जान'
निखत झरीनने (Nikhat Zareen) वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 52 किलो वजनीगटात सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने थायलंडच्या जुटामास जिटपाँगचा 5 - 0 असा पराभव केला. यानंतर देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान, सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) देखील निखतचे ट्विट करून अभिनंदन केले. सलमानच्या ट्विटने भारवून गेलेल्या निखतने सलमानच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. सलमान बरोबरच अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांनी देखील निखतचे तोंडभरून कौतुक केले होते. मात्र निखत सलमानच्या ट्विटची आतूरतेने वाट पाहत होती.
हेही वाचा: MI vs DC : 'सचिनचा मुलगा असणे गुन्हा आहे काय?'
निखत झरीन ही सलमानची खूप मोठी फॅन आहे. सलमान तिचा क्रश आहे हे तिने मान्यच केले. याचबरोबर निखतने सलमानला 'भाई' म्हणण्यास नकार दिला. एनडीटिव्हीशी बोलताना निखतला सलमान भाईने तुझे अभिनंदन केले असे विचारल्यानंतर निखत म्हणाली की, 'कोण भाई? तुमचा भाई? मी कधी भाई म्हणाले नाही. कम ऑन मी त्याला कधी भाई म्हणाले नाही. लोकांसाठी तो भाई असेल माझ्यासाठी तर तो माझी जान आहे.' ती पुढे म्हणाली की, 'सलमानची मी खूप मोठी फॅन आहे. त्याला भेटणे माझे स्वप्न आहे. माझी दोनच स्वप्न आहेत. मला ऑलिम्पिक पदक जिंकायचं आहे. आणि त्यानंतर सलमान खानला मुंबईत भेटायचं आहे.'
हेही वाचा: मुंबई इंडियन्सची जर्सी घालून कार्तिकने आठवण करून दिली की...
या सगळ्यानंतर सलमानने या क्लिपवर रिट्विट केले. तो म्हणाला की, 'या सुवर्ण कामगिरीसाठी अभिनंदन निखत'. यावर निखतने माझे स्वप्न पूर्ण झाले. मला विश्वास बसत नाहीये की सलमान खानने माझ्यासाठी ट्विट केले. माझा विजय खास केल्याबद्दल खूप खूप आभार. मी हा क्षण माझ्या ह्रदयात कायमचा कोरून ठेवणार आहे.' यावर सलमानने देखील मजेशीर ट्विट केले. तो म्हणाला की, 'फक्त मला नॉक आऊट करू नकोस म्हणजे झालं. खूप सारं प्रेम... ते जे काही करत आहेस ते करत रहा माझा हिरो सिल्वेस्टर स्टॅलोनसारखी ठोसेबाजी करत रहा.'
Web Title: Nikhat Zareen Sweet Twitter Exchange With Salman Khan After Being World Boxing Champion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..