Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Women T20 World Cup Qualified Teams: २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकाविषयीच्या उत्साहाच्या वातावरणात या स्पर्धेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेत थेट प्रवेश मिळवलेल्या नऊ संघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Women T20 World Cup Qualified Teams

Women T20 World Cup Qualified Teams

ESakal

Updated on

२०२६ च्या महिला टी२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन इंग्लंड आणि वेल्स करत आहेत. बाद फेरीच्या सामन्यांची सुरुवात जवळ येत असताना २०२८ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण नऊ संघ पात्र ठरल्याचे वृत्त समोर आले आहे. खराब कामगिरीमुळे २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलेला पाकिस्तान संघदेखील २०२८ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठीच्या १२ संघांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com