World Boxing Championship : जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत निशांत देवचा एकतर्फी विजय

भारताच्या निशांत देव याने जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत ब्रिटनच्या लेविस रिचर्डसन याचा ३-१ असा पराभव करून ७१ किलो वजनी गटात शानदार सुरुवात केली. निशांतने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक हल्ले करून लेविसला पहिल्या राऊंडमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली.
World Boxing Championship
World Boxing Championshipsakal

बुस्तो अर्सिझिओ (इटली) : भारताच्या निशांत देव याने जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत ब्रिटनच्या लेविस रिचर्डसन याचा ३-१ असा पराभव करून ७१ किलो वजनी गटात शानदार सुरुवात केली. निशांतने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक हल्ले करून लेविसला पहिल्या राऊंडमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली.

लेविस हा २०२२ मधील राष्ट्रकुल स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता आहे. दुसऱ्या गेमध्येही निशांतने आपला हल्ला अधिक वेगवान केला परिणामी त्याला ५-० असे वर्चस्व मिळवता आले. एकीकडे निशांत आपले वर्चस्व सिद्ध करत असताना भारताचे आशास्थान असलेला दुसरा बॉक्सर शिवा थापा याला (६३.५ किलो) पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

World Boxing Championship
Ind vs Eng Test : भारताचे लक्ष्य : अबकी बार ३-१ च्या पार! ; धरमशालामधील थंड वातावरणात गरमागरम खेळाची अपेक्षा

विद्यमान विश्वविजेत्या उझबेकिस्तानच्या रुस्लाम अब्हुलाएव याने शिवा थापावर मात केली. रुस्लामच्या आक्रमक खेळामुळे शिवा थापा याला बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले; परंतु तो फार काळ टिकाव धरू शकला नाही. अखेर रेफ्रींनी ही लढत थांबवली. या स्पर्धेत भारताची निराशाजनक कामगिरी होत आहे. नऊपैकी सहा बॉक्सर्सना पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठी ही पात्रता स्पर्धा असल्यामुळे भारतीयांसाठी महत्त्वाची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com