World Cup 2019 : ओल्ड ट्रॅफर्डवरून आज एकही विमान उडणार नाही, वाचा का

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

- आयसीसीने उचलले एक महत्त्वाचे पाऊल. 

- भारत-न्यूझीलंड सामन्याच्या ओल्ड ट्रॅफर्डवर वेळेस येथे 'नो फ्लाईंग' झोन जाहीर करण्यात आला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या ओल्ड ट्रॅफर्डवर सामना सुरु आहे. या सामन्यात सुरक्षेच्या दृष्टीनं आयसीसीने एक महत्त्वाचे पाऊ उचलले आहे. हा सामना सुरु असताना ओल्ड ट्रॅफर्डवरून एकही विमान उडणार नाही. भारत-न्यूझीलंड सामन्याच्या वेळेस येथे 'नो फ्लाईंग' झोन जाहीर करण्यात आला आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मैदानावरुन गेलेल्या एका विमानावर 'जस्टीस फॉर काश्मीर' असे लिहण्यात आले होते. याच सामन्यात दुसऱ्यांदा एक हेलिकॉप्टर गेले ज्यावर 'भारताने काश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि काश्मिरला मुक्त करावे' असा संदेश देण्यात आला होता. 

दुसऱ्यांदा एक हेलिकॉप्टर गेले आणि त्यावर 'इंडिया स्टॉप गेनोसाईड अँड फ्री कश्मीर' म्हणजेच ' भारताने काश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि ते मुक्त करावे' अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन्ही घटनांचा आयसीसीने निषेध केला होता. ''ही गोष्ट विश्वचषकात दुसऱ्यांदाच घडली. त्यामुळे आम्ही निराश आहोत. आम्ही या याची निंदा करतो,'' असे आयसीसीने म्हटले होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No flight will fly over Old Trafford today