देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी BCCI ची कठोर नियमावली

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेवेळी कोणत्याही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात येणार नाही.
Cricket News
Cricket NewsBCCI Twitter

देशांतर्गत क्रिकेट संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राज्य क्रिकेट असोसिएशनला खास सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू आणि राज्य असोसिएशनसाठी बीसीसीआयने खास नियमावली जारी केली आहे. यात स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही खेळाडूने सार्वजनिक वाहतूकीचा वापर करु नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेवेळी कोणत्याही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात येणार नाही.

देशांतर्गत स्पर्धेसाठी असोसिएशनला 20 खेळाडू आणि 10 स्टाफ सदस्यांसह 30 जणांना ताफ्यात सहभागी करुन घेता येणार आहे. या सर्व सदस्यांनी 6 दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईनचे पालन करणेही बंधनकारक असल्याचा उल्लेख नियमावलीत करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक संघाला एक डॉक्टर टीमसोबत ठेवणे बंधनकारक आहे.

Cricket News
IPL 2021 : विराट कोहली RCB ची कॅप्टन्सीही सोडेल?

स्पर्धेदरम्यान संबंधित डॉक्टरनेही सार्वजनिक वाहनातून प्रवास टाळावा, अशा सूचना बीसीसीआयकडून करण्यात आल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेट हंगामाला वर्षाच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रंगणारे सामने पुढील वर्षीच्या एप्रिलपर्यंत असतील.

Cricket News
न्यूझीलंडनं पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली : अख्तर

देशांतर्गत क्रिकेटमध्ये जे खेळाडू सहभागी होणार आहेत त्यांच्या फीसंदर्भातही बीसीसीआयने माहिती दिली आहे. संघातील 20 खेळाडू मॅच फी साठी पात्र असतील. प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना 100 टक्के तर उर्वरित 9 खेळाडूंना 50 टक्के फी दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com