Nooshin Al Khadeer U19 WC : टीम इंडियाची बाजीगर! 2005 ची हार पचवत बनवला विश्वविजेता संघ

Nooshin Al Khadeer U19 T20 World Cup
Nooshin Al Khadeer U19 T20 World CupESAKAL

Nooshin Al Khadeer U19 T20 World Cup : भारतीय महिला क्रिकेट इतिहासात 2003 आणि 2005 ही वर्ष स्वप्नभंगाची ठरली होती. 2003 ला ऑस्ट्रेलियाच्या पुरूष संघाने भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. तर 2005 मध्ये देखील ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचे पहिला वहिला वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नाचा चुराडा केला होता.

ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाला फक्त 117 धावाच करता आल्या होत्या. यानंतर भारतीय महिला संघांनी 2017 ला वनडे आणि 2020 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये फायनल गाठली होती.

मात्र वर्ल्डकपच्या ट्रॉफीने त्यावेळी देखील हुलकावणी दिली होती. अखेर 2023 मध्ये 19 वर्षाखालील भारतीय महिला संघाने 2005 पासून अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.

Nooshin Al Khadeer U19 T20 World Cup
U 19 WC: इंग्रजांना रडवणारी कोण आहे तीतास साधु? टीम इंडियाला बनवले वर्ल्ड चॅम्पियन

भारताच्या 2005 च्या वर्ल्डकप संघातील खेळाडू नूशीन अल खदीर हिच्या मनात ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या त्या पराभवाची सल कायम होती. फिरकीपटू असलेल्या नूशीनला फायनल मध्ये फारशी चमक दाखवता आली नव्हती. अखेर 18 वर्षानंतर नूशीनची ही सल दूर झाली.

ती प्रत्यक्ष जरी मैदानावर खेळून वर्ल्डकप जिंकू शकली नसली तरी तिने भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील पहिला वहिला वर्ल्डकप जिंकून देणारा संघ मात्र तयार केला. नूशीन ही इंग्लंडला मात देत 19 वर्षाखालील महिला वर्ल्डकप जिकणाऱ्या भारतीय संघाची कोच आहे.

Nooshin Al Khadeer U19 T20 World Cup
U-19 WC Ind vs ENG : काला चश्मा गाण्यावर थिरकल्या चॅम्पियन! पाहा ICC चा VIDEO

नूशीनची महिला क्रिकेटपटू म्हणून कारकिर्द

सध्या भारताच्या 19 वर्षाखालील महिला संघाचे प्रशिक्षक पद भुषवत असलेली माजी भारतीय क्रिकेटपटू नूशीनने 2002 मध्ये वनडे क्रिकेटमधून आपले पदार्पण केले होते. फिरकीपटू असलेल्या नूशीनने भारतीय महिला संघाकडून 78 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात 3.57 च्या इकॉनॉमी रेटने धावा देत 100 विकेट्स घेतल्या.

14 चेंडूत 5 विकेट्स ही तिची कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरी ठरली. याचबरोबर तिने कसोटी क्रिकेटमध्ये 5 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या. तर टी 20 क्रिकेटमध्ये 1 विकेट घेतली आहे. नूशीनने भारताकडून 2008 ला ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपला शेवटचा सामना खेळला.

Nooshin Al Khadeer U19 T20 World Cup
Shafali Verma: "...म्हणून हे शक्य झालं" इतिहास घडवणाऱ्या कप्तान शेफाली रडली

आयसीसीने यंदा पहिल्यांदाच 19 वर्षाखालील महिलांसाठी टी 20 वर्ल्डकपचे आयोजन केले होते. 19 वर्षाखालील महिला टी 20 वर्ल्डकपची पहिलीच स्पर्धा भारतीय संघाने गाजवली. संपूर्ण स्पर्धेत भारताला फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला.

फायनलमध्ये शफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय संघाने इंग्लंडला 68 धावात गुंडाळले. भारताकडून टी साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मन्नत कश्यप, शफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

इंग्लंडे 69 धावांचे आव्हान भारताने 14 व्या षटकात तीन विकेट्स गमावून पार केले. शफाली वर्माने 15 तर मौम्या तिवारी आणि तृषाने प्रत्येकी 24 - 24 धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com