लसीकरणाच्या गोंधळात जोकोविच व्हिजामध्ये चूक करुन फसला!

Novak Djokovich
Novak DjokovichSakal

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा दणका बसला आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेचा ताज आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहचलेल्या जोकोविचला विमानतळावर अडकल्याचे वृत्त आहे. व्हिजा अर्जामध्ये जोकोविचनं चुकीची माहिती भरल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यात आला आहे. (Novak Djokovic has been denied entry to Australia after an extraordinary mix up with his visa application)

ऑस्ट्रेलियन मेलबर्न ‘द ऐज’च्या वृत्तानुसार, जोकोविच बुधवारी स्थानीय वेळेनुसार मध्यरात्री टुल्लमरीन विमानतळावर पोहचला. पण व्हिजा अर्जातील चुकांमुळे त्याला विमानतळावरच रोखण्यात आले आहे. मेडिकल सूट मिळवण्याच्या नादात त्याने व्हिजा अर्जाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्यावर ताठकळत बसण्याची वेळ आली असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसते. त्यामुळे टेनिस जगतातील नंबर वन नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळणार की नाही हा संभ्रम आणखी गडद झालाय. जोकोविचनं अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. लसीकरण पूर्ण न झाल्याने तो वादात अडकला होता.

Novak Djokovich
बुमराहनं 'मार' सहन केला एकाचा; राग निघाला दुसऱ्यावर

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्याची प्रक्रिया

एकतर खेळाडूनं कोरोना लशीचे दोन्ही डोस घेणं अनिवार्य आहे.. जर लस घेतली नसेल तर त्यामागचे मे़डिकल कारण काय होते. त्यासंदर्भातील रिपोर्ट सादर करुन खेळाडूला एन्ट्री मिळू शकते. ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोकोविचनं दुसरा मार्ग स्विकारला आहे. मेडिकल रिपोर्टसह तो स्पर्धेसाठी सज्ज झाला होता. मात्र आता यात आणखी विघ्न आल्याचे दिसते.

Novak Djokovich
अँडरसन! सचिन तेंडुलकरनंतर खास पराक्रम करणारा एकमेव 'हिरा'

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचीही कठोर भूमिका

ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष स्टीफन पार्निस यांनी जोकोविच जगाला चुकीचा संदेश देत असल्याचे म्हटले होते. तो किती उत्तम खेळतो याच्याशी काहीही संबंध नाही. पण जर तो लस घेण्यास तयार नसेल तर त्याला खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे परखड मत मांडले होते. त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही याप्रकरणाची दखल घेतली होती. जोकोविचच्या मेडिकल रिपोर्टमध्ये लस न घेण्याचे योग्य कारण दिले नसेल तर त्याला घरी परत पाठवू, असा इशारा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com