कपिल देव यांनी पाकिस्तानी फलंदाजांचे 'हेल्मेट वाजवून' केलं होतं पदार्पण

kapil dev
kapil dev
Summary

भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी लॉर्ड्सवर वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. तेथूनच फक्त क्रिकेट जगतात नव्हे तर प्रत्येक भारतीयामध्ये एक नवी उर्जा संचारली होती.

१९८३ चा वर्ल्डकप म्हणजे भारतीय क्रिकेट इतिहासात माईल स्टोन ठरणारी घटना. भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी लॉर्ड्सवर वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. तेथूनच फक्त क्रिकेट जगतात नव्हे तर प्रत्येक भारतीयामध्ये एक नवी उर्जा संचारली होती. आज याच कपिल देव यांचा वाढदिवस (Kapil Dev Birthday) आहे. नुकताच भारतीय क्रिकेटमधील माईल स्टोन म्हणून गणल्या जाणाऱ्या १९८३ च्या वर्ल्डकपवर बेतलेला सिनेमा ८३ (83 Movie) प्रदर्शित झाला. त्यामुळे कपिल देव आणि त्या काळातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या कामगिरीला उजाळा मिळाला.

कपिल देव हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू (All Rounder) म्हणून ओळखले जातात. भारताच्या प्रत्येक अष्टपैलू खेळाडूची तुलना ही कपिल देव यांच्याबरोबरच होते. कित्येक अष्टपैलू खेळाडू आले आणि गेले मात्र त्यांच्या इतकी उंची अजून कोणत्यात अष्टपैलू खेळाडूला गाठता आलेली नाही.

कपिल देव यांचा गाजलेले प्रथम श्रेणी पदार्पण ( Kapil Dev First Class Career)

६ जानेवारी १९५९ चंदीगडमध्ये कपिल देव रमलाल निखंज यांचा जन्म झाला. त्यांनी १९७५ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हरियाणाकडून पदार्पण केले. त्यांनी पादर्पणाच्या सान्यातच पंजाबची अवस्था सर्वबाद ६३ धावा अशी केली. कपिल देव यांनी आपल्या प्रथम श्रेणी पदार्पणाच्या हंगामात ( १९५७ - ७६ ) ३० सामन्यात तब्बल १२१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी हरियाणाकडून १७ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले.

Kapil Dev
Kapil Dev

पाकिस्तानला कपिल देव यांच्या वेगाची भरली धडकी ( Kapil Dev Debut Against Pakistan)

कपिल देव यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवल्यानंतर १६ ऑक्टोबर १९७८ मध्ये फैजलाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.पदार्पणाच्या सामन्यात त्यांना फार काही यश मिळाले नाही. त्यांनी फक्त सादिक मोहम्मद याची विकेट घेण्यात यश आले. मात्र त्यांनी पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्या वेगाने धडकी भरवली होती. त्यांनी पाकिस्तानच्या अनेक फलंदाजांची 'हेलमेट वाजवली' होती.

kapil dev
VIDEO : 'लॉर्ड' टोपण नाव कधी पडलं; शार्दुल ठाकूरनं सांगितला किस्सा

विकेटची शंभरी धावांची वेगवान हजारी पार करणारे सर्वात तरुण खेळाडू

पाकिस्तानी फलंदाजांचे हेलमेट वाजवून पदार्पण करणाऱ्या कपिल देव यांनी आपली कारकिर्द वेगवान केली. ते कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट आणि १००० धावा पूर्ण करणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले होते. विशेष म्हणजे कपिल देव हे आपल्या १८४ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दित कधीही धावबाद झाले नाहीत.

सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय विकेट्सचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडले (Highest Wickets In Test and ODI)

कपिल देव यांनी १९९४ मध्ये श्रीलंकेच्या हरशान तिलकरतनेला बाद करत हेडली यांचे ४३१ कसोटी विकेट्सचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडले. त्यानंतर त्यांनी ४३४ विकेट घेत कसोटीमधून निवृत्ती घेतली. त्यांचे हे कसोटीतील सर्वाधिक विकेट्सचे रेकॉर्ड आठ वर्षे अबाधित राहिले होते. नंतर कर्ल्टली वॉल्शने २००० मध्ये हे रेकॉर्ड मोडले.

याचबरोबर कपिल देव यांनी गार्नर यांचा सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स घेण्याचा विक्रम मागे टाकला. कपिल देव यांनी आपल्या एकदिवसीय कारकिर्दित २५३ विकेट्स घेतल्या आहे. नंतर हे रेकॉर्ड वासिम अक्रमने १९९४ मध्ये मोडले. कपिल देव इतके तंदुरुस्त होते की ते एकाही कसोटी सामन्याला दुखापतीमुळे मुकले नाहीत.

कपिल देव यांच्या कारकिर्दितला सुवर्ण क्षण : १९८३ वर्ल्डकप (Kapil Dev Conribution in 1983 World Cup)

कपिल देव भारताच्या पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे फक्त कर्णधार नव्हते. त्यांचे वर्ल्डकपमधील नेतृत्व 'लिडींग फ्रॉम द फ्रंट' असे होते. त्यांनी ८ सामन्यात १२ विकेट्स घेत ३०३ धावा केल्या होत्या. याचबरोबर ७ झेलही पकले होते. त्यांची उपांत्य पूर्व फेरीतील झिंम्बावे विरुद्धची १७५ धावांची खेळी तर भारतीय क्रिकेट इतिहासातील अजरामर खेळी म्हणून ओळखली जाते.

भारताने त्या काळातल्या दादा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजचा फायनलमध्ये पराभव करत वर्ल्डकप उंचावला. देश म्हणून भारतासाठी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत अभिनास्पद बाब ठरली. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या काळातील भारताच्या सुवर्ण क्षणांमध्ये १९८३ च्या वर्ल्डकपची नोंद होते.

kapil dev
अँडरसन! सचिन तेंडुलकरनंतर खास पराक्रम करणारा एकमेव 'हिरा'

वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराला मॅच फिक्सिंगमध्ये ओढले (Kapil Dev Match Fixing Controversy)

कपिल देव यांनी क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर ते प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी १९९९ ला भारतीय संघाचे प्रशिक्षक पदही भुषवले होते. मात्र त्यांचा १० महिन्याचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ सर्वसाधारणच राहिला. या काळात त्यांना मनोज प्रभाकरने मॅच फिक्सिंग प्रकरणात गोवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र चौकशीनंतर हे आरोप काढून टाकण्यात आले. मात्र या वादामुळे कपिल देव यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. नंतर कपिल देव यांनी सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनाही मागे टाकत २००२ मध्ये शतकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा किताब पटकावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com