Novak Djokovic : जोकोविच व्हिलचेअरवरून खेळला टेनिस; VIDEO होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic Play Tennis On Wheelchair Video Gone Viral

Novak Djokovic : जोकोविच व्हिलचेअरवरून खेळला टेनिस; VIDEO होतोय व्हायरल

Novak Djokovic : जागतिक स्तरावरील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने तेल अविवमध्ये व्हिलचेअरवर बसून टेनिस खेळले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या जोकोविचने इस्त्रायलचा टेनिसपटू एले चायोटसोबत व्हिलचेअरवर बसून टेनिसचा आनंद घेतला. यानंतर जोकोविचने चायोटशी गप्पा देखील मारल्या. याबाबतचा व्हिडिओ रविवारी स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला.

दरम्यान, नोव्हाक जोकोविचने तेल अविव ओपन स्पर्धेत मारिन सिलिकचा पराभव केला. सर्बियाच्या जोकोविचने 2022 मधील आपले तिसरे टायटल जिंकले. तर कारकिर्दितील 89 वे टायटल आपल्या नावावर केले. जोकोविचने इस्त्रायलच्या हार्ड कोर्टवर मारिनचा 6-3, 6-4 असा पराभव केला. यापूर्वी यंदाच्या हंगामात जोकोविचने रोममध्ये क्ले कोर्टवरील टायटल आणि ग्रास कोर्टवरील विम्बल्डन टायटल जिंकले होते.

हेही वाचा: Suryakumar Yadav : रोहितच्या डोक्यात भन्नाट प्लॅन, सूर्याला आता डायरेक्ट 23 ऑक्टोबरलाच मैदानात उतरवावं?

जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन जिंकल्यानंतर पहिल्यांदाच एकेरीची स्पर्धा खेळली होती. त्याने जुलैमध्ये विम्बल्डन जिंकत 21 वे ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले. त्यानंतर तो युएस ओपनमध्ये त्याच्यावर अमेरिकेत प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आल्याने खेळू शकलो नव्हता. गेल्या महिन्यात तो रॉजर फेडररची फेअरवेल स्पर्धा लेव्हर कपमध्ये देखील खेळला होता. जोकोविचने रविवारी कारकिर्दितील 127 वी फायनल खेळली.