Suryakumar Yadav : रोहितच्या डोक्यात भन्नाट प्लॅन, सूर्याला आता डायरेक्ट 23 ऑक्टोबरलाच मैदानात उतरवावं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Suryakumar Yadav

Suryakumar Yadav : रोहितच्या डोक्यात भन्नाट प्लॅन, सूर्याला आता डायरेक्ट 23 ऑक्टोबरलाच मैदानात उतरवावं?

Suryakumar Yadav : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा टी 20 सामना 16 धावांनी जिंकला. भारताने मालिका 2 - 0 अशी जिंकली. दरम्यान भारताने 20 षटकात 237 धावा केल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने दमदार प्रत्युत्तर देत 221 धावा केल्या. डेव्हिड मिलरने नाबाद 106 धावांची शतकी खेळी केली. भारताकडून सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत आक्रमक 61 धावांची खेळी केली. सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवबद्दल एक मजेशीर वक्तव्य केले.

हेही वाचा: Virat Kohli : विराट इंदौरला निघालेल्या टीम सोबत प्रवास करत नाहीये; काय आहे कराण?

रोहित शर्मा म्हणाला की, 'सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची लय पाहता आम्ही विचार करत आहोत की त्याला आता थेट 23 ऑक्टोबरलाच मैदानात उतरवावं' रोहितने बुमराहच्या फिटनेसबाबत देखील वक्तव्य केले. तो म्हणाला की, बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने आमची चिंता वाढली आहे. आम्हाला शेवटच्या षटकातील गोलंदाजी सुधरावी लागले. या एका विभागात प्रतिस्पर्धी संघ आम्हाला आव्हान देऊ शकतो. त्यामुळे आम्ही फलंदाजीत काही अतिरिक्त धावा करण्याचा प्रयत्न करत असतो.'

हेही वाचा: Women's Asia Cup T20 : भारताचा 181 धावा करूनही मलेशियाविरूद्ध 30 धावांनी विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी 20 सामना 4 ऑक्टोबरला इंदौर येथे होणार आहे. या सामन्यात भारतातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. यात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. यानंतर भारत 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. तेथे तो 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरूद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.