esakal | 'कॅलेंडर ग्रँडस्लॅम' पासून जोकोविच काही अंतरावर
sakal

बोलून बातमी शोधा

Jelena Djokovic and novak djokovic

'कॅलेंडर ग्रँडस्लॅम' पासून जोकोविच काही अंतरावर

sakal_logo
By
सुशांत जाधव

US Open 2021 : वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या इराद्याने नोवाक जोकोविच कोर्टवर उतरला आहे. सर्बियन खेळाडूने अमेरिकन ओपन स्पर्धेची क्वार्टर फायनल गाठली असून खास विक्रमासह ग्रँडस्लॅम सर्कल पूर्ण करण्यापासून तो तीन पावले दूर आहे. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) प्री क्वार्टर फायनलमध्ये अमेरिकेच्या जेन्सन ब्रूक्स्बी (Jenson Brooksby) ला पराभूत केले. जोकोविचचा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी जेलेना (Jelena Djokovic) देखील स्टेडियमवर उपस्थितीत होती. आता क्वार्टर फायनलमध्ये त्याच्यासमोर इटलीच्या मॅट्टेओ बेरेट्टिनी (Matteo Berrettini) याच्याविरुद्ध भिडणार आहे.

20 वेळा ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या जोकोविचने कामगिरीतील सातत्य कायम राखत अमेरिकन ओपन स्पर्धेत धडाकेबाज खेळ करुन दाखवला. प्री क्वार्टर फायनल लढतीत त्याने जेन्सन ब्रूक्स्बीला 1-6, 6-3, 6-2, 6-2 असे पराभूत केले. अमेरिकन खेळाडूने पहिला सेट जिंकून नोवाक जोकोविचला टक्कर देण्याची क्षमता असल्याचे संकेत दिले. पण अनुभवाच्या जोरावर सुपर कमबॅक करत जोकोविचने पुढील तीन सेट सहज जिंकून स्पर्धेत आगेकूच केली.

हेही वाचा: IND vs ENG : शास्त्री-कोहली यांच्यासाठी कोरोनाची वेगळी नियमावली?

टेनिसच्या मैदानात यंदाचे वर्ष जोकोविचसाठी खासच आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकून कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याची त्याच्याकडे संधी आहे. एकाच वर्षात चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनाही जमलेला नाही. त्यामुळेच जोकोविचच्या कामगिरीकडे टेनिस चाहत्यांचे लक्ष लागून आहे. यापूर्वीच जोकोविचने नदाल आणि फेडरर यांच्या सर्वाधिक 20 वेळा ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

loading image
go to top