
Novak Djokovic VIDEO : आईवरचं प्रेम! जोकोविचनं सामन्यानंतर केलं असं काही की...
Novak Djokovic Mother Australian Open : नोव्हाक जोकोविचने रशियाच्या रूब्लेव्हचा 6-1, 6-2, 6-4 असा पराभव करत ऑस्ट्रेलिया ओपनची सेमी फायनल गाठली. आता त्याचा मुकाबला अमेरिकेच्या टॉमी पॉलशी होणार आहे. त्याने क्वार्टर फायनलमध्ये अमेरिकेच्याच बेन शेल्टॉनचा 7-6 (8-6), 6-3, 5-7, 6-4 असा पराभव केला.
हेही वाचा: Australian Open Sania Mirza : आमचं नातं सॉलिड! मी 14 वर्षाची असताना रोहन... सानिया फायनमध्ये पोहचल्यानंतर भावूक
जोकोविचने रशियाच्या रूब्लेव्हचा पराभव केल्यानंतर एक खास संदेश दिला. त्याने आ सामना झाल्यानंतर बोलताना जोकोविच म्हणाला की, 'मला आज काही तरी सांगायचं आहे. आज माझ्या फिजिओथेरपिस्टचा वाढदिवस आहे. तो सध्या इथं नाहीये. तो लॉकर रूममध्ये आहे त्याला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.'
जोकोविच पुढे म्हणाला की,'याचबरोबर काल माझ्या आईचा देखील वाढदिवस होता. माझी आई इथं आली आहे. लव्ह यू आई! माझी आई इथं आली आहे.' यानंतर जोकोविचने आपल्या आईसाठी हॅपी बर्थडे हे गाणे देखील गुणगुणले. त्याच्यासोबत संपूर्ण स्टेडियमनेही जोकोविचच्या आईला गाणे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा: Australia Open 2023 : सानिया मिर्झा अन् रोहन बोपण्णाने गाठली मिश्र दुहेरीची अंतिम फेरी
जोकोविचने आपली 44 वी ग्रँडस्लॅम सेमी फायनल गाठली आहे. तो आता फेडररच्या 46 ग्रँडस्लॅम सेमी फायनल खेळण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहचला आहे. याचबरोबर जोकोविजने ऑस्ट्रेलियन ओपनमधील आपला सलग 26 वा सामना जिंकला. त्याने आंद्रे आगासीच्या विक्रमाशी बरोबरी देखील केली आहे.
हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?