खेळ मोठा की खेळाडू

मोठे आणि प्रथितयश खेळाडू जेव्हा स्वतःच्या अहंकाराला प्राधान्य देतात आणि ‘आपणच सर्वश्रेष्ठ आहोत’ असं समजायला लागतात.
Novak Djokovic
Novak Djokovicsakal

मोठे आणि प्रथितयश खेळाडू जेव्हा स्वतःच्या अहंकाराला प्राधान्य देतात आणि ‘आपणच सर्वश्रेष्ठ आहोत’ असं समजायला लागतात तेव्हा ‘खेळ मोठा की खेळाडू’ हा प्रश्न प्रकर्षानं निर्माण होतो. प्रत्येकाचा एक काळ असतो; पण अत्युच्च शिखरावर असताना कुठला खेळाडू (Player) कसा वागतो यावर त्याची सदैव टिकणारी महानता ठरत असते, म्हणून खेळातील गुणवत्तेत सर्वश्रेष्ठ असलेला खेळाडू महान असतोच असं नाही.

टेनिसमधील अव्वल आणि विक्रमवीर नोवाक जोकोविच (Novak Djokovic) सध्या याच फेऱ्यात अडकला आहे. टेनिसमधील (Tennis) अफाट गुणवत्तेपेक्षा अहंकारामुळे त्याची कारकीर्द पुन्हा एकदा डागाळली जात आहे. लसीकरण केलं की नाही याची माहिती न देऊन त्यानं ऑस्ट्रेलियन ओपनला आपल्यासाठी नियमात बदल करायला भाग पाडलं; पण ऑस्ट्रेलियन सरकार मात्र आपल्या नियमावर ठाम राहिलं. मेलबर्नला आलेल्या जोकोविचला या पार्श्वभूमीवर विमानतळावरच रोखण्यात आलं. जोकोविच इथवरच थांबला नाही तर, ऑस्ट्रेलियन सरकारविरुद्ध कायदेशीर लढाई लढतानाही, आपण किती अहंकारी आहोत, हे त्यानं दाखवून दिलं.

Novak Djokovic
सचिन तेंडुलकरबद्दल चुकीची माहिती; अमिताभ बच्चन यांचा माफीनामा

जगभरात पुनःपुन्हा थैमान घालणाऱ्या कोरोनानं खेळाच्या पारंपरिक चौकटी मोडायला, तसंच ज्यांचा कधीही विचार केला नसेल असे निर्बंध घालायला भाग पाडलं आहे; पण आता कुणीही थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. ‘शो मस्ट गो ऑन...’ हीच सगळ्यांची भूमिका आहे. याच विचारानं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पुढच्या आठवड्यात होत आहे. सध्याची परिस्थिती चिंता करण्यासारखी असल्यानं काटेकोर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात लसीकरण ही लाईफलाईन म्हणायला हरकत नाही; पण एखाद्यासाठी अपवाद केला जातो तेव्हा मात्र हेतूबाबत शंका निर्माण होते.

ग्रँड स्लॅमचा टेनिसहंगाम सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपननं सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन खेळाडूंसाठीही लसीकरणाची अट कायम ठेवली; पण अखेरच्या क्षणी जोकोविकला त्यातून सूट देण्यात आली. आपलं लसीकरण झालं आहे की नाही याची माहिती जोकोविच देत नव्हता.

सध्याचं टेनिस जोकोविचपासून सुरू होते. त्यातच तो गतविजेताही आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाशी त्यानं बरोबरी केलेली आहे. सध्या रॉजर फेडरर दुखापतीमुळे कोर्टाबाहेर असून, तसाही तो निवृत्तीच्या रेषेवर उभा आहे. किंग राफेल नदालही दुखापतीशी झुंजत आहे. कोरोनातून तो नुकताच बाहेर येऊन ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यास सज्ज होत आहे. त्यामुळे जोकोविच नसला तर ऑस्ट्रेलियन ओपनच्या ग्लॅमरवर परिणाम होणार याची जाणीव असल्यानं नियमाला अपवाद करण्यात आला हे उघड आहे. या ठिकाणी डॅनिल मेदवेदेव किंवा त्सित्सिपास या खेळाडूंनी लसीकरण केलं आहे की नाही हे सांगण्यास नकार दिला असता तर ही सूट ऑस्ट्रेलियन टेनिसनं त्यांना दिली असती का, हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे एका खेळाडूसाठी नियमात बदल करून कोरोनाकाळात, जिथं सर्वत्र अतिशय काळजी बाळगणं आवश्यक आहे तिथं वेगळा पायंडा पाडला गेला.

यूएस ओपनचा बोध घ्यावा

शेवटी, हा खेळ आहे. कधीही काहीही होऊ शकतं, कुणीही विजयाचा सिकंदर नसतो. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून गोल्डन स्लॅम करण्यास निघालेल्या सिकंदर जोकोविचच्या हाती ऑलिंपिकचं ब्राँझपदकही लागलं नाही.

दोन वर्षांपूर्वीच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत लाईन रेफ्रींना चेंडू मारल्याबद्दल जोकोविचवर कारवाई करण्यात आली आणि त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं होतं. अमेरिकन ग्रँड स्लॅम संघटनांनी नियमाचा भंग केलेल्या (भले मग तो अजाणतेपणी का असेना) जोकोविचला शिक्षा केली होतीच.

Novak Djokovic
लंबूजी ईशांतच्या प्रेमाचा किस्सा; बास्केट बॉलच्या मैदानातून फुलली प्रेम कहाणी

ब्रॅडमन, सचिन, पेले, मेस्सी आदर्श

टेनिसशिवाय इतर खेळाडूंचा विचार केला जातो तेव्हा क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर यांनी आणि फुटबॉलमध्ये पेले, मेस्सी यांनी स्वतःला खेळापेक्षा कधीही श्रेष्ठ मानलं नव्हतं आणि नाही. विराट कोहली आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे खेळाडू भलेही आक्रमक प्रवृत्तीचे आहेत; पण तेही, आपल्यासाठी नियमात बदल करा, असा आग्रह कधी धरत नाहीत. टेनिसपटूंचंही उदाहरण द्यायचं तर, रॉड लेव्हरसारखी मंडळी तर जुन्या काळातली; पण बोर्ग, पीट सॅम्प्रास, आंद्रे आगासी या महान खेळाडूंनीही स्वतःला खेळापेक्षा कधीच मोठं मानलं नाही.

भारतीय खेळाडूला फटका

भारतात १५ ते १८ वयोगटांतील मुलांना लस द्यायला सुरुवात झाली ती एक जानेवारीपासून; त्यामुळे १७ वर्षीय ज्युनिअर टेनिसपटू अमन दहिया याला त्याआधी लस मिळण्याचा प्रश्नच येत नव्हता. तो ऑस्ट्रेलियन ओपनच्या ज्युनिअर विभागासाठी पात्र ठरला; परंतु त्यांच्या नियमानुसार लस घेतलेली नसल्यानं तो खेळू शकत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅमच्या संयोजकांची परस्परविरोधी भूमिका स्पष्ट होते.

सर्व काही पैशासाठी

आता कोणत्याही स्पर्धेची गणितं खेळापेक्षा त्याच्या अर्थकारणात गुंतलेली असतात. ग्लॅमर नसेल तर प्रायोजक कसे मिळणार आणि मिळाले तरी ग्लॅमर असलेल्या खेळाडूंचे चेहरे स्पर्धेत दाखवावे लागणार. हे अर्थकारण खेळासाठी आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचं असलं तरी स्वतःच्याच नियमाची चौकट मोडणं व्यवहार्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com