माद्रिद मास्टर्स टेनिस : स्टेफानोसला हरवून जोकोविच विजेता

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

माद्रिद : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने माद्रिद ओपन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने ग्रीसचा आव्हानवीर स्टेफानोस त्सित्सिपास याचे आव्हान 6-3, 6-4 असे परतावून लावले. जोकोविचने याबरोबरच स्पेनचा मातब्बर टेनिसपटू रॅफेल नदाल याच्या 33 मास्टर्स विजेतेपदांच्या विश्‍वविक्रमाशी बरोबरी केली. 

जोकोविच 31 वर्षांचा असून, 20 वर्षांच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्याने एक तास 32 मिनिटांत हा सामना जिंकला. जोकोविचने सलग तीन गेम जिंकत चांगली आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये त्याने ब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटच्या नवव्या गेममध्ये मिळविलेला ब्रेक पुरेसा ठरला. या स्पर्धेत त्याने एकही सेट गमावला नाही. स्टेफानोसने आधीच्या फेरीत नदालला हरविले होते. त्याने आधीच्या सामन्यात जोकोविचवर मात केली होती. गेल्या ऑगस्टमध्ये टोरांटोतील रॉजर्स करंडक स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली होती. जोकोविचने आधीच्या फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमची घोडदौड रोखली होती. 

हा विजय प्रामुख्याने आत्मविश्‍वास उंचावणारा असल्यामुळे फार महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियन ओपननंतर माझा सर्वोत्तम खेळ होत नव्हता. मी फॉर्मच्या शोधात होतो. मला खेळ उंचावण्याची गरज होती. स्टेफानोस फार प्रतिभाशाली टेनिसपटू आहे. नदालविरुद्ध त्याचा सामना रात्री उशिरा संपला. त्यामुळे त्याचा खेळ नेहमीसारखा होत नव्हता. 
- नोव्हाक जोकोविच, सर्बियाचा टेनिसपटू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NOvak Djokovic wins Madrid Masters Tennis