जोकोविचची विजयी सलामी 

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

नोव्हाक जोकोविचने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोल्गोपोलोव याला 6-1, 6-3 असे हरवित सहज दुसरी फेरी गाठली. 

रोम - नोव्हाक जोकोविचने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोल्गोपोलोव याला 6-1, 6-3 असे हरवित सहज दुसरी फेरी गाठली. 

गेल्या आठवड्यात माद्रिदमधील स्पर्धेत ब्रिटनच्या काईल एडमंडकडून जोकोविचला धक्का बसला होता. कोपराच्या दुखापतीनंतर पुनरागमन यशस्वी व्हावे म्हणून जोकोविच प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी विंबल्डननंतर त्याला एकाही स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठता आलेली नाही. जागतिक क्रमवारीत त्याची 18व्या स्थानावर घसरण झाली आहे. 
गेल्या वर्षी जोकोविचने उपविजेतेपद मिळविले होते. पहिल्या फेरीतील सफाईदार विजयामुळे त्याचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. 

रोममधील सलामी उत्साहवर्धक आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत या स्पर्धेत जास्त फेऱ्यांपर्यंत आगेकूच करू शकेन असा विश्‍वास वाटतो. 
- नोव्हाक जोकोविच 

 

Web Title: Novak Djokovic wins opening match