Virat Kohli : विराटला ब्रेक घेण्याचा झाला तोटा..? कसोटीत शतकांच्या रेसमध्ये पडला मागे

Kane Williamson Test Century Records :
Kane Williamson Test Century Records marathi news
Kane Williamson Test Century Records marathi newssakal

Kane Williamson Test Century Records : भारतीय संघ सध्या इंग्लंड संघासोबत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे.

यशस्वी जैस्वालने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी द्विशतक झळकावले, तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत सहा विकेट घेतल्या. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या पुनरागमनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विराट कोहली संघात सामील होणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, विराट कोहिलीला ब्रेक घेण्याचा झाला तोटा झाला आहे, कसोटीत शतकांच्या रेसमध्ये तो मागे पडला आहे. केन विल्यमसनने त्याला मागे टाकले आहे.

Kane Williamson Test Century Records marathi news
Ind vs Eng : अँडरसनच्या रिव्हर्सने रोहितला सपशेल गंडवले; खराब कामगिरीमुळे कर्णधार अडचणीत?

खरंतर, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात माउंट मौनगानुई येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात केन विल्यमसनने दुखापतीनंतर पुनरागमन करत आपले 30 वे कसोटी शतक झळकावले आणि विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले. कोहली आणि ब्रॅडमन यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 29 शतके आहेत. आता विल्यमसनने 30 शतके झळकावून जो रूट, मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉल यांची बरोबरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 32 कसोटी शतकांसह स्मिथ अजूनही या यादीत आघाडीवर आहे. रुट आणि विल्यमसन यांच्या नावे प्रत्येकी 30 आणि विराट कोहलीची 29 शतके आहेत. विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक शामदार शतक ठोकले. गेल्या 9 कसोटी डावांतील त्याचे हे पाचवे शतक आहे. तो जगातील सध्याचा नंबर 1 कसोटी फलंदाज देखील आहे.

कसोटीत सर्वाधिक शतके (खेळणारे खेळाडू)

  • स्टीव्ह स्मिथ- 32 शतके (107 सामने)

  • केन विल्यमसन- 30 शतके (97 सामने*)

  • जो रूट- 30 शतके (137 सामने*)

  • विराट कोहली- 29 शतके (113 सामने)

  • चेतेश्वर पुजारा - 19 शतके (103 सामने)

  • दिमुथ करुणारत्ने- 16 शतके (89 सामने*)

  • अँजेलो मॅथ्यूज- 16 शतके (109 सामने*)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com