Ind vs Eng : अँडरसनच्या रिव्हर्सने रोहितला सपशेल गंडवले; खराब कामगिरीमुळे कर्णधार अडचणीत?

India vs England Test Series News 2024 : फॉरमॅट कुठलाही असो, रोहित शर्माची बॅट बोलते पण....
rohit sharma poor form test cricket ind vs eng 2nd test james anderson
rohit sharma poor form test cricket ind vs eng 2nd test james andersonsakal

India vs England Test Series : रोहित शर्माची गणना जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. फॉरमॅट कुठलाही असो, त्याची बॅट बोलते. पण जेव्हा त्याच्यासारखा महान गोलंदाज समोर असतो, तेव्हा ही लढत रंजक होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही असाच काहीसा प्रकार घडला, जेव्हा रोहित शर्मा महान जेम्स अँडरसनच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याच्या शेवटच्या 8 डावांची आकडे फारच खराब आहे. दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामने आणि आता इंग्लंडविरुद्धचे दोन सामने, त्याला 4 सामन्यांच्या 8 डावांतून एकदाही 40 धावांपर्यंत मजल मारता आलेली नाही. याच कारणामुळे आता चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

रोहितचा खराब फॉर्म चिंतेचा विषय

जेम्स अँडरसनच्या घातक रिवर्स स्विंगचे रोहित शर्माकडे कोणतेही उत्तर नव्हते. तो फक्त 13 धावा करून आऊट झाला. त्याला पहिल्या डावात 14 धावांवर नवोदित शोएब बशीरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर भारतीय कर्णधार सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे.

पण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये रोहित चांगली कामगिरी करत आहे, आणि अलीकडेच त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही शतक झळकावले होते. पण रेड बॉल फॉरमॅटमध्ये त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. जेम्स अँडरसन आणि रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये 6 वेळा आमनेसामने आले आहेत. यातून अँडरसनने तिसऱ्यांदा रोहितची शिकार केली.

रोहित शर्माची शेवटच्या 8 डावातील कामगिरी

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन कसोटी- 5

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन कसोटी- 0

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन कसोटी – 39

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन कसोटी – नाबाद 16

  • विरुद्ध इंग्लंड, हैदराबाद कसोटी- 24

  • विरुद्ध इंग्लंड, हैदराबाद कसोटी- 39

  • विरुद्ध इंग्लंड, विशाखापट्टणम कसोटी- 14

  • विरुद्ध इंग्लंड, विशाखापट्टणम कसोटी- 13

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com