NZ vs SL Weather: न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यावर पावसाचे सावट, पाकिस्तानला होणार फायदा; समीकरण जाणून घ्या

New Zealand Vs Sri Lanka Weather Forecast World Cup 2023
New Zealand Vs Sri Lanka Weather Forecast World Cup 2023

New Zealand Vs Sri Lanka Weather Forecast World Cup 2023 : वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने जवळपास संपत आले आहे. 45 पैकी 40 सामने खेळल्या गेले आहेत. वर्ल्ड कपची उत्कंठा शिगेला पोहोचली असून चारपैकी तीन संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आधीच पात्र ठरले आहेत.

इंग्लंड, श्रीलंका, नेदरलँड आणि बांगलादेशचे संघ या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता तीन संघ एका जागेसाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत रंगली आहे.

New Zealand Vs Sri Lanka Weather Forecast World Cup 2023
Meg Lanning Retires : 'हीच माझ्यासाठी योग्य वेळ...' ऑस्ट्रेलियन कर्णधारने अचानक केली निवृत्तीची घोषणा!

पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे आठ सामन्यांतून प्रत्येकी आठ गुण आहेत. नेट रन रेटच्या आधारे न्यूझीलंड (+0.398) पुढे आहे. त्यानंतर पाकिस्तान (+0.036) आणि अफगाणिस्तान (-0.338) आहेत. न्यूझीलंडचा शेवटचा सामना गुरुवारी बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानचा सामना शनिवारी कोलकात्यात इंग्लंडविरुद्ध तर शुक्रवारी अहमदाबादमध्ये अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

तिन्ही संघांनी आपापले सामने जिंकल्यास सर्वोत्तम नेट रन रेट असलेला संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र, न्यूझीलंडला आणखी एक चिंता आहे. बंगळुरूमध्ये शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेल्यास त्यांना केवळ एका गुणावर समाधान मानावे लागेल.

अशा स्थितीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आपले सामने जिंकणे आवश्यक आहे. मग चांगला नेट रनरेट असलेला संघ पुढे जाईल. पाकिस्तानचा नेट रन रेट अफगाणिस्तानच्या तुलनेत खूप चांगला आहे.

पाऊस रद्द झाल्यास काय होईल?

पावसामुळे सामना रद्द झाल्यास न्यूझीलंडला केवळ नऊ गुण मिळू शकतील. अशा स्थितीत इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा पराभव करील आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ अफगाणिस्तानला पराभूत करील अशी तो प्रार्थना करेल. गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असणारा संघ भारताविरुद्ध उपांत्य फेरीत खेळेल.

बंगलोर हवामान अंदाज

Accuweather नुसार, बंगळुरूमध्ये दिवसभरात पावसाची शक्यता 90 टक्के आहे. 86 टक्के हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. रात्री पावसाचा अंदाज 54 टक्के आहे. त्याच वेळी, आकाश ढगाळ राहण्याची 91 टक्के शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com