Olympic Committee president Brigitte Henriques Brigitte Olive resigns just 14 months away start Paris Olympics
Olympic Committee president Brigitte Henriques Brigitte Olive resigns just 14 months away start Paris Olympicssakal

Olympic Committee President Resigns :पॅरिस ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षा ब्रिगेटी यांचा राजीनामा

पॅरिस ऑलिंपिक समितीची आज मेडिसन डु स्पोर्टस फ्रान्सकिस येथे बैठक

पॅरिस : ऑलिंपिक स्पर्धेला जेमतेम एक वर्ष शिल्लक असताना यजमान फ्रेंच ऑलिंपिक समितीला धक्का बसला आहे. समितीच्या अध्यक्षा ब्रिगेटी हेन्रिक्स यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला आहे.

पॅरिस ऑलिंपिक समितीची आज मेडिसन डु स्पोर्टस फ्रान्सकिस येथे बैठक झाली आणि त्यात ब्रिगेटी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. पॅरिसमध्ये पुढील वर्षी होणारी ही ऑलिंपिक स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान नियोजित आहे.

Olympic Committee president Brigitte Henriques Brigitte Olive resigns just 14 months away start Paris Olympics
IPL 2023 : 'लाख'मोलाचे खेळाडू करोडपतींवर भारी!

पॅरिस ऑलिंपिक समितीचे माजी सरचिटणीस दिदियर सेमिनेट यांच्याबरोबर ब्रिगेटी यांचा वाद होता. या पॅरिस ऑलिंपिक समितीच्या कारभाराचे ऑडिट करण्याची मागणी ब्रिगेटी यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे केली होती. मानसिक तणावाचे कारण देत ब्रिगेटी या दोन महिने रजेवरही गेल्या होत्या. डिसेंबर महिन्यात त्या पुन्हा रुजू झाल्या होत्या. सेनिमेट यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले होते, त्याचवेळी ब्रिगेटी यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचाही दावा दाखल केला आहे.

Olympic Committee president Brigitte Henriques Brigitte Olive resigns just 14 months away start Paris Olympics
Harsha Bhogle IPL 2023 : हर्षा भोगलेंनी चेन्नईच्या प्रेक्षकांचे कौतुक करत कोणावर साधला निशाणा?

पॅरिस ऑलिंपिक समितीचे विद्यमान सरचिटणीस अस्टेड गुयार्ट यांच्याकडे सध्या तरी अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. गुयार्ट सर्व संचालकांची बैठक आयोजित करून पुढील अध्यक्ष निवडणुकीची तयारी करतील.

गेल्या महिन्यात आपल्याला टार्गेट करून आपल्या विरोधी मोहीम सुरू करण्यात आली होती, माझ्याविरोधात खोटी माहिती प्रसिद्ध करण्यात येऊन माझे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला जात होता, असाही आरोप ब्रिगेटी यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com