esakal | ऑलिंपिक शिबिरेच सुरू राहणार - किरेन रिजिजू
sakal

बोलून बातमी शोधा

kiren rijiju

प्रेक्षकांविना होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर कोणतेही प्रतिबंध नाहीत. हा निर्णय घेऊन स्पर्धा होत असेल, तर त्यास आमचा कोणताही आक्षेप नसेल.
- किरेन रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री

ऑलिंपिक शिबिरेच सुरू राहणार - किरेन रिजिजू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी सुरू असलेली शिबिरेच सुरू राहतील. अन्य खेळाडूंना शिबिरातून घरी पाठविण्यात येईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. कोरोनाची साथ पसरू नये म्हणून हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसारच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय शिबिर स्थगित करण्याचे ठरविले आहे. पण, ऑलिंपिकबाबत अंतिम निर्णय न झाल्याने त्यासाठीची शिबिरे खंडित न करण्याचाही निर्णय घेतला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा टोकियोत जुलै-ऑगस्टमध्ये आहे.

नवोदितांच्या अभ्यास तसेच खेळाडूकडे लक्ष देणारी केंद्रे स्थगित करण्यात आली आहेत. हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे कोणीही निराश होण्याची गरज नाही. परिस्थिती सुधारल्यावर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात होईल, असे रिजिजू यांनी सांगितले.

भारतातील विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धा, इंडिया ओपन गोल्फ तसेच इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. क्रीडा प्राधिकरणाच्या बेंगळुरू केंद्रात प्रशिक्षणार्थींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही. त्याचबरोबर या प्रशिक्षणार्थींना शिबिर सोडून जाण्याची परवानगी नाही. भारतीय क्रिकेट मंडळ, भारतीय बॉक्‍सिंग महासंघ तसेच भारतीय फुटबॉल महासंघाने आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.