Sakshi Malik: ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक सोडणार कुस्ती; ब्रिजभूषण सिंहनं दिली प्रतिक्रिया

ब्रिजभूषण सिंहचा जवळचा सहकारी WFIचा अध्यक्ष बनल्यानं साक्षी मलिकनं कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Wrestling Federation Of India Election Brij Bhushan Sharan Singh
Wrestling Federation Of India Election Brij Bhushan Sharan SinghESAKAL

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली आहे. माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंहची खास व्यक्ती म्हणून संजय सिंह यांची ओळख आहे. या निवडीमुळं निराश झालेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकनं कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. यावर ब्रिजभूषण शरण सिंहनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. (Olympic medalist Sakshi Malik to quit wrestling Brijbhushan Singh gave first reaction)

ब्रिजभूषणवर लैंगिक शोषणाचे आरोप

माजी अध्यक्ष आणि भाजपचा खासदार ब्रिजभुषण शरण सिंह याच्यावर साक्षी मलिकसह विनेश फोगाट यांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यासाठी त्यांनी दिल्लीत जंतर मंतर मैदानावर उपोषणही केलं होतं. त्यांच्या या उपोषणाला आणखी दोन महिला कुस्तीपटूंनीही समर्थन दिलं होतं. (Marathi Tajya Batmya)

तसेच बजरंग पुनिया या कुस्तीपटूनही कायम त्यांच्या बाजूनं लढा दिला. इतकंच नव्हे मोदी सरकार ब्रिजभूषणवर कोणतीही कारवाई करत नसल्यानं या कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता.

ब्रिजभूषणच्या जवळचा सहकारी अध्यक्षपदी

दरम्यान, आपला अध्यक्षपदाचा कालावधी संपत आल्यानं ब्रिजभूषण सिंह राजीनामा न देण्यावर ठाम होता. अखेर कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपदावरुन तो पायउतार झाला. त्यानंतर नव्या अध्यक्षासाठी निवडणूक जाहीर झाली. पण ब्रिजभूषण प्रकरणामुळं ही निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. अखेर आज निवडणूक होऊन ब्रिजभूषण सिंहचा जवळचा सहकारी आणि बिझनेस पार्टनर संजय कुमार सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या समर्थकांनी संजय सिंह यांच्याऐवजी ब्रिजभूषणच्याच गळ्यात हार घालून आनंद साजरा केला.

साक्षी मलिकचा कुस्ती सोडण्याचा निर्णय

या संपूर्ण प्रक्रियेनंतर निराश झालेल्या ऑलिम्पकविजेत्या साक्षी मलिकनं आपण निराश झाल्याचं सांगत पत्रकार परिषदेत कुस्ती सोडत असल्याचं जाहीर केलं. साक्षीनं म्हटलं की, "ब्रिजभूषणच्या कृत्यांविरोधात आम्ही मनापासून लढलो पण अध्यक्ष जर ब्रिजभूषणसारख्या व्यक्तीसारखाच असेल तर जो त्याचा सहकारी आणि बिझनेस पार्टनर असेल तर तो जर या फेडरेशनमध्ये राहिला तर मी माझी कुस्ती त्यागते मी आता पुन्हा इथं दिसणार नाही. ज्यांनी आत्तापर्यंत मला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानते" (Latest Marathi News)

साक्षीच्या निर्णयावर ब्रिजभूषणची प्रतिक्रिया

साक्षीनं कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे, अशी माहिती पत्रकारांनी ब्रिजभूषण सिंह याला सांगत यावर त्याची प्रतिक्रिया विचारली. त्यावर ब्रिजभूषण सिंहनं "आपला याच्याशी काय संबंध?" अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांवर चिडून त्यानं ही प्रतिक्रिया दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com