Keshav Maharaj : केशव महाराजच्या झुंजार खेळीसोबतच बॅटवरील 'ओम'नेही घेतलं लक्ष वेधून

Along with Keshav Maharaj's fighting innings, 'Om' on the bat also attracted attention
Keshav Maharaj
Keshav Maharaj esakal

Keshav Maharaj : वर्ल्डकप 2023 मध्ये काल (दि.17) एक मोठा उलटफेर झाला. लिंबूटिंबू संघ नेदरलँडने पॉवर पॅक्ट अशा दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. विशेष म्हणजे नेदलँडचे 245 धावांचे आव्हान देखील आफ्रिकेला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 207 धावात गारद झाला.

आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि केशव महाराज यांनी झुंज देत प्रतिकार केला. मात्र इतर फलंदाजांकडून त्यांना साथ न मिळाल्याने नेदरलँडची सरशी झाली. डेव्हिड मिलरने 43 धावांची तर केशव महाराजने 40 धावांची खेळी केली. केशव महाराजने लुंगी एन्गिडीसोबत शेवटच्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली.

Keshav Maharaj
NZ vs AFG : चेन्नईत अजून एक धक्का; आता उपविजेते अफगाणिस्तानच्या रडारवर?

दरम्यान, भारतीय मूळ असलेल्या केशव महाराजच्या खेळीबरोबरच त्याची बॅट देखील कालच्या सामन्यात चर्चेचा विषय ठरली. केशव महाराजच्या बॅटवर हिंदू धर्मातील पवित्र चिन्ह ओम कोरलं होतं. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दक्षिण आफ्रिका - नेदलँड यांच्यातील सामना पावसामुळे प्रत्येकी 43 षटकांचा खेळवण्यात आला. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडची अवस्था 5 बाद 82 धावा अशी केली.

Keshav Maharaj
SA vs NED : नेदरलँडने परंपरा ठेवली कायम; चोकर्सची टी 20 पाठोपाठ वनडेतही केली शिकार

मात्र यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्डने 69 चेंडूत झुंजार 78 धावा केल्या. त्याला तळातील फलंदाजांनी देखील चांगली साथ दिली. दत्तने 9 चेंडूत 23 धावा चोपत नेदरलँडला 245 धावांपर्यंत पोहचवले.

43 षटकात 246 धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची अवस्था बिकट झाली होती. त्यांचाही निम्मा संघ 89 धावात गारद झाला. त्यानंतर क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

Keshav Maharaj
SA vs NED : आफ्रिकेने 'चोकर्स'पणा दाखवलाच!ऑरेंज आर्मीनं केला वर्ल्डकपमधील दुसरा उलटफेर

मात्र नेदरलँडचा फिरकीपटू बीकने एका पाठोपाठ एक असे धक्के देत आफ्रिकेच्या अडचणीत वाढ केली. क्लासेन 28 तर डेव्हिड मिलर 43 धावा करून बाद झाले. धावा आणि चेंडू यातील अंतर वाढत चालले होतं.

नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केशव महाराजने आफ्रिकेची अवस्था 9 बाद 166 धावा झाली असताना एन्गिडी सोबत शेवटच्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. मात्र त्याची ही 40 धावांची खेळी आफ्रिकेला काही विजय मिळवून देऊ शकली नाही. अखेर बीकनेच त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडत आफ्रिकेचा वर्ल्डकपमधील पहिल्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com