On This Day Virender Sehwag : सेहवागसाठी आजचा दिवस आहे फारच खास

आजच्याच दिवशी विरेंद्र सेहवागने आपला आदर्श सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवले
Virendra Sehwag
Virendra Sehwagesakal

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसाठी (Virender Sehwag) आजचा म्हणजे 8 डिसेंबर हा दिवस फार खास आहे. कारण आजच्याच दिवशी विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपला आयडॉल सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पावलावर पाऊल ठेवले आणि इतिहासात आपल्या खेळीची नोंद केली. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशक ठोकरणारा दुसरा खेळाडू ठरला. On This Day Virender Sehwag hit double century

Virendra Sehwag
Ashes AUSvsENG : कांगारुंनी इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले

विरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2011 रोजी होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने (Team India) वेस्ट इंडीज समोर 418 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) 149 चेंडूत 219 धावांची आक्रमक खेळी केली. दुसऱ्या बाजूने गौतम गंभीरनेही 67 धावांची खेळी केली होती.

Virendra Sehwag
Ashes : स्टार्कच्या पहिल्याच चेंडूची झाली इतिहासात नोंद|Video

विशेष म्हणजे या सामन्यात विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) भारतीय संघाचा कर्णधार होता. या सामन्यात सेहवाग बरोबरच सुरेश रैनाने 44 चेंडूत 55 धावांची खेळी केली होती. भारताच्या या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ 49.2 षटकात 265 धावात संपुष्टात आला होता. विकेटकिपर दिनेश रामदीनने 96 चेंडूत 96 धावांची खेळी केली होती.

Virendra Sehwag
Champions League : टोनी क्रूस, असेनसिओचे गोल; रियल माद्रिद टॉपवर

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम द्विशतक करणारा पहिला फलंदाज हा देखील भारतीयच होता. विरेंद्र सेहवागचा आदर्श सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 2010 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध नाबाद 200 धावांची खेळी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com