hockey
hockeysakal

Paris Olympics : ऑलिंपिक पात्रता एक सामना दूर ; भारतीय महिला हॉकी संघासमोर जर्मनीचे आव्हान

बलाढ्य जर्मनीचा अडथळा आहे. ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेत जर्मनीविरुद्ध उद्या होणाऱ्या सामन्यात भारतीय महिलांना सर्वस्व झोकून प्रयत्न करावे लागणार आहे.

रांची : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ आता केवळ एक विजय दूर आहे; परंतु त्यामध्ये बलाढ्य जर्मनीचा अडथळा आहे. ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेत जर्मनीविरुद्ध उद्या होणाऱ्या सामन्यात भारतीय महिलांना सर्वस्व झोकून प्रयत्न करावे लागणार आहे. मायदेशात होत असलेल्या या पात्रता स्पर्धेत भारताला अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही.

सलामीला अमेरिकेकडून ०-१ अशा परभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंड आणि इटलीचा पराभव करून ब गटातून उपांत्य फेरी गाठली तरी गेल्या दोन सामन्यात लौकिकानुसार खेळ करताना सर्व क्षेत्रात कामगिरी उंचावली. आता त्यात सातत्य राखण्याची गरज आहे. जर-तरच्या गणितावर अवलंबून राहाण्यापेक्षा पात्रतेची मोहीम उद्याच पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला प्रथम सकारात्मक राहावे लागेल.

न्यूझीलंड आणि इटलीविरुद्ध भारताचा बचाव उजवा ठरला होता. या दोन्ही संघांची आक्रमणे यशस्वीरीत्या रोखली होती. कर्णधार सविता, उदिता, मोनिका आणि निक्की प्रधान यांनी एकही चूक केली नाही. आपल्या अर्धात आलेली सर्व आक्रमणे त्यांनी थोपवली होती. मधल्या फळीत सलिमा टेते हिने नेहा गोयलसह चपळता दाखवत आघाडी फळीतील खेळाडूंसाठी गोल करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर लालरेमसियामी, संगीता कुमारी, डुंग डुंग आणि नवनीत कौर यांनी मधल्या फळीतीतल खेळाडूंचे प्रयत्न वाया जाऊ दिले नाहीत आणि संधी मिळताच त्याचे शानदार गोलांत रूपांतर केले.

पेनल्टी कॉर्नरवर गोल करणे ही भारतीयांची कमकुवत बाजू राहिलेली आहे; परंतु आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या उदिता दुहानने इटलीविरुद्ध दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर केले; मात्र जर्मनीविरुद्ध उदिता एकटी पुरेशी ठरणार नाही. इतरांचेही तेवढेच योगदान आवश्यक असेल. उदिता फारच चांगला खेळ करत आहे. इटलीविरुद्ध तिने मारलेले काही स्लॅप शॉटस् अप्रतिम होते; पण पेनल्टी कॉर्नरवर आता विविधता असायला हवी, असे प्रशिक्षक जेन्नेक शोपमन यांनी सांगितले. भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या जर्मनी संघाने अ गटात सात गुणांसह अव्वल स्थान मिळवले.

...तर अजून एक संधी मिळणार

या स्पर्धेतील अव्वल तीन संघ ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहेत. उद्याचा सामना गमावला, तरी भारतासाठी सर्व मार्ग बंद होणार नाहीत. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या लढतीतून आणखी एक संधी मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com