वर्णभेदाच्या प्रकरणात आणखी एक इंग्लिश प्लेयर अडचणीत

england team
england teamtwitter

किशोर वयात वर्णभेदाच्या मुद्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणखी एक इंग्लिश प्लेयर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. वर्णभेदाच्या ट्विटमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सन याचे क्रिकेट करियर दावणीला लागले आहे. पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी करणारा रॉबिन्सन लक्षवेधी कामगिरीशिवाय 2012 आणि 2०13 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आला. याप्रकरणात मोठी चुक झाल्याची कबुलीही त्याने दिली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश इंग्लंड बोर्डाने दिले असून यासंदर्भातील अहवाल येईपर्यंत रॉबिन्सनला राष्ट्रीय संघाबाहेरच रहावे लागणार आहे. हे प्रकरण ताजे असताना आता याप्रकरणात आणखी एक इंग्लिश खेळाडू रडारवर आहे.

england team
मित्रा ह्रदय तुटते! अश्विनने घेतली मांजरेकरांची फिरकी

इंग्लंडच्या संघात असलेल्या आणखी एका प्लेयअरला चौकशीला समोरे जावे लागणार आहे. वयाच्या 16 व्या वर्षी या इंग्लिश प्लेयरने वर्णभेदासंदर्भात ट्विट केले होते. विस्डेन डॉट कॉमने या क्रिकेटरचे ट्विटचा स्क्रीन शॉट पोस्ट केलाय. मात्र त्याचे नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे..... तुम्ही एखाद्या आशियनसोबत बाहेर जात आहात या आशयाच्या वाक्यासह क्रिकेटरने केलेल्या ट्विटमध्ये #asianthroughhandthrough #hweollo #chinky हे हॅशटॅक वापरण्यात आले आहेत. क्रिकेटरने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली आक्षेपार्ह पोस्ट आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, असे इग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

england team
माफीनाम्यानंतरही क्रिकेट करियरला ब्रेक! नेमकं काय आहे प्रकरण

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी रॉबिन्सन याने 2012 आणि 2013 मध्ये केलेल्या जुने वादग्रस्त ट्विट व्हायरल झाले होते. या ट्विटसंदर्भात त्याने माफीही मागितली. त्यानंतर सामना संपताच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. रॉबिन्सन याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळीही केली होती. जुन्या ट्विटमुळे त्याच्या दिमाखदार खेळावर पाणी फेरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com