क्वालिफायर 1 विजेता संघ ठरतोय IPL किंग, वाचा आत्तापर्यंतचा इतिहास

यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर कोणता संघ आपले नाव कोरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
gujarat titans
gujarat titansesakal

यंदाचा आयपीएल १५ वा सीझन नव्या संघांनी आणि युवा खेळाडूंनी चांगलाच गाजला आहे. गतवर्षी चॅम्पियन ठरलेली चेन्नईची कामगिरी यंदा निराशजनक ठरली. मात्र, यंदाच्या ट्रॉफीवर कोणता संघ आपले नाव कोरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे. दरम्यान, क्वॉलिफायर १ बद्दल मजेशीर आणि तितकीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

gujarat titans
विजय शंकरला प्रत्येक मॅचमध्ये का खेळवत आहे गुजरात टायटन्स? 'CID' करणार तपास

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त तीन वेळाच असं घडलं आहे की, जेव्हा क्वालिफायर 1 चा विजेता संघ चॅम्पियन बनला नाही. 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि 2017 च्या मोसमात रायझिंग पुणे सुपर जायंट्स क्वालिफायर 1 मध्ये जिंकूनही अंतिम फेरीत हरले. उर्वरित आठ सीझनला, क्वालिफायर 1 मधील केवळ विजेता संघच चॅम्पियन बनण्यात यशस्वी झाला.

त्यामुळे क्रिकेट जगतात यंदा गुजरात टायटस्न संघ आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरणार या चर्चेने क्रिकेट जगतात उधाण आले आहे.

२०११ क्वालिफायर १ चेन्नई सुपर किंग्स संघाने 6 गडी राखून जिंकला. अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जने ५८ धावांनी विजय मिळवला.

२०१२ क्वालिफायर १ कोलकाता नाइट रायडर्सने 18 धावांनी जिंकला. कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये ५ गडी राखून विजय मिळवला.

2013 क्वालिफायर 1- चेन्नई सुपर किंग्जने 48 धावांनी सामना जिंकला. फायनलमध्ये मुंबईने 23 धावांनी विजय मिळवला.

2014 क्वालिफायर 1- कोलकाता नाइट रायडर्सने 28 धावांनी विजयी. फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ३ गडी राखून विजय मिळवला.

2015 पात्रता 1- मुंबई इंडियन्सने 25 धावांनी विजयी. अंतिम फेरीतही मुंबई इंडियन्सने ४१ धावांनी विजय मिळवला.

2016 क्वालिफायर 1- रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 4 गडी राखून जिंकला. अंतिम फेरीत सनरायझर्सने 8 धावांनी सामना जिंकला.

2017 पात्रता 1- रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 20 धावांनी विजयी. अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने 1 धावाने विजय मिळवला.

2018 क्वालिफायर 1- चेन्नई सुपर किंग्ज 2 गडी राखून विजयी. अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जने 8 विकेट्स राखून विजय मिळवला.

2019 क्वालिफायर 1- मुंबई 6 गडी राखून जिंकली. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सचा 1 धावांनी विजय.

2020 पात्रता 1- मुंबई इंडियन्स 57 धावांनी विजयी. अंतिम फेरीतही मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने विजय मिळवला.

2021 क्वालिफायर 1- चेन्नई सुपर किंग्ज 4 गडी राखून जिंकला. अंतिम फेरीतही चेन्नई सुपर किंग्जने २७ धावांनी विजय मिळवला.

gujarat titans
Hardik Pandya | 'हार्दिक पांड्या हे नाव कायम विकलं जातं'

प्लेऑफ फॉरमॅट 2011 मध्ये सुरू झाला

2011 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्लेऑफचे स्वरूप सादर करण्यात आले आणि एकूण चार सामने आयोजित केले गेले. यापूर्वी, 2008, 2009 आणि 2010 च्या आयपीएल हंगामात प्रत्येकी दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना खेळण्याची तरतूद होती.

प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असतात. गुणतालिकेतील अव्वल-2 संघ क्वालिफायर-1 खेळतील आणि विजेता संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर पराभूत संघाला क्वालिफायर २ मध्ये भाग घेण्याची संधी मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com