
Padma Awards: भारतीय सरकारकडून शनिवारी (२५ जानेवारी) पद्म पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीने योगदान देण्याऱ्या वक्तींचा या पुरस्काराने गौरव केला जातो. पद्म हे भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी आहेत.
विविध क्षेत्रांमधील १३९ सेवाव्रतींना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. पाच क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचीही नाव पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीत आहेत.