Mohammed Shami and Siraj react to Pahalgam terror attack : मंगळवारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. पहलगाम येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर क्रिकेट वर्तुळातूनही हळहळ आणि निषेध व्यक्त केला जातो आहे.