Pak v Eng Memes : नया है यह! 'हालात बदल गए, लेकीन...‘, Iconic Pose चा सोशल मीडियावर धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pak v Eng Memes

Pak v Eng Memes : नया है यह! 'हालात बदल गए, लेकीन...‘, Iconic Pose चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Pak v Eng Memes : मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. विजेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 137 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत 5 गडी गमावून 138 धावा केल्या आणि सामना जिंकला.

सामन्यादरम्यान अनेक क्षण असे आले की जेव्हा सामना पाकिस्तानच्या दिशेने जाऊ लागला, परंतु बेन स्टोक्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने सामना आणि विजेतेपद पण जिंकले. दरम्यान, आता 'फ्रास्ट्रेटेड पाकिस्तानी फॅन्स'चा एक नवीन मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या डावाच्या 19 व्या षटकात जेव्हा सॅम करनने मोहम्मद नवाजची विकेट काढली तेव्हा स्टेडियमच्या कॅमेर्‍याने प्रेक्षकांमधील एक चाहता पाहिला, जो बाद झाल्यामुळे पूर्णपणे निराश झाला होता. योगायोगाने या चाहत्याने प्रत्येकाला 'निराश पाकिस्तान फॅन' ची आठवण करून दिली, जो त्याच्या प्रतिक्रियेसाठी 2019 मध्ये पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतर व्हायरल झाला होता. अशा परिस्थितीत लोक आता या व्यक्तीचा फोटो जबरदस्त पद्धतीने व्हायरल करत आहेत.