Video: पाकिस्तानी क्रिकेटर केवळ टॉवेल गुंडाळून पॅव्हेलियनमध्ये; चाहते संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

imam ul haq captured cameraman in dressing room

Video: पाकिस्तानी क्रिकेटर केवळ टॉवेल गुंडाळून पॅव्हेलियनमध्ये; चाहते संतापले

Sri Lanka vs Pakistan 2nd Test: पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने दुसऱ्या डावात 5 बाद 176 धावा केल्या आहेत. श्रीलंकेने आतापर्यंत पाकिस्तानवर 323 धावांची आघाडी घेतली आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेसाठी दिमुथ करुणारत्ने 27 आणि धनंजय डी सिल्वा 30 धावांवर नाबाद होते. त्याचवेळी, सामन्यादरम्यान इमाम-उल-हकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Rishabh Pant बोलत होता...! धोनीने फेकून दिला फोन; काय आहे प्रकरण...

दुसऱ्या डावापूर्वीच इमाम-उल-हकचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने तो चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा आहे जिथे इमाम-उल-हक पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये फक्त टॉवेल गुंडाळून बसला होता. कॅमेरामनचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि कॅमेराची दिशा बदलली. तो ड्रेसिंग रूममध्ये टॉवेल घालून बसला आहे, हे पाहून चाहते संतापले असून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: IND vs WI 3rd ODI : शिखर धवनला इतिहास रचण्याची संधी

व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत. पाकिस्तानी इमाम-उल-हकला ट्रोल देखील केले जात आहे. इमामच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर तो पहिल्या डावात चांगल्या लयीत दिसत पण अवघ्या 32 धावांवर बाद झाला. दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेची आघाडी 323 धावांची असून त्यांच्याकडे अद्याप पाच विकेट शिल्लक आहेत. अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. साहजिकच यजमान संघ सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे.

Web Title: Pak Vs Sl 2nd Test Imam Ul Haq Captured Cameraman In Dressing Room Just In Towel During Video Goes Viral Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top