Sikandar Raza : पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या 'सिकंदर 'ला पाक एअर फोर्सने नाकारले होते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Air Force Rejected Sikandar Raza Became Star Cricketer Of Zimbabwe

Sikandar Raza : पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या 'सिकंदर 'ला पाक एअर फोर्सने नाकारले होते

Sikandar Raza Pakistan Air Force : पाकिस्तानने जरी टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमी फायनल गाढली असली तरी कालपर्यंत त्यांची अवस्था फार बिकट झाली होती. या बिकट अवस्थेला पाकिस्तानी खेळाडूंची सुमार कामगिरी जबाबदार आहे. याचबरोबर झिम्बाब्वेच्या खेळाडूंची झुंजार वृत्ती देखील याचं एक कारण ठरलं होतं. कारण पाकिस्तानने झिम्बाब्वेविरूद्धचा अवघ्या 1 धावेने पराभव केला होता.

पाकिस्तानचा पराभव करण्यात पाकिस्तानमध्येच जन्मलेल्या सिकंदर रझाचा मोठा वाटा होता. त्याने मोक्याच्या क्षणी 3 विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. याच सिकंदर रझाचा पाकिस्तानमधून झिम्बाब्वेपर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान एअर फोर्सचे आकर्षण असलेला सिंकदर रझाला खूप प्रयत्न करूनही फायटर पायलट होता आलं नव्हतं.

हेही वाचा: Babar Azam : क्रेडिट हमारा है! बाबरचा ड्रेसिंग रूम मधील 'तो' व्हिडिओ व्हायरल

सिंकदर रझाने cricket.com.au या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पाकिस्तानातील बालपणाविषयी माहिती दिली. तो म्हणाला की, 'मला लहान असताना फायटर पायलट व्हायचं होतं. मी पाकिस्तान एअर फोर्सची प्रवेश परीक्षा देखील दिली होती. या परीक्षेला जवळपास 10 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र फक्त 60 जणच निवडले गेले. मी या 60 जणांपैकी एक होतो.'

सिकंदर रझा पुढे म्हणाला की, 'ही परीक्षा पास झाल्यानंतर जवळपास साडेतीन वर्षांनी त्यांनी (पाकिस्तान एअर फोर्स) मला वैमानिक म्हणून उड्डाण करण्यासाठी अनफिट ठरवले. यावेळी त्यांनी वैद्यकीय कारणाने मला अनफिट ठरवले होते.'

हेही वाचा: Rohit Sharma Fan : रोहितच्या जबरा फॅनला मैदानातील घुसखोरी पडली लाखात, पोलिसांनी...

पाकिस्तान एअर फोर्सने नाकारल्यानंतर रझाने सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे एरोनॉटिकल इंजिनिअर होण्याचा पर्याय होता. मात्र वेगाचे वेड असलेल्या रझाने अर्ध्यावरच इंजिनिअरिंग सोडलं. त्यानंतर तो स्कॉटलँडला त्याचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेला. त्यानंतर त्याने ग्लासगोव्ह कॅलेडोनियन विद्यापीठातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

दरम्यान, 2009 मध्ये स्कॉटलँड येथे असतानाच रझाला क्रिकेटचे वेड लागले. तो तिथे नेहमी क्लब क्रिकेट खेळायचा. यानंतर त्याने क्रिकेटकडे एक पेशा म्हणून पाहिले. रझा शिक्षणानंतर झिम्बाब्वेला परतला. 2002 मध्येच त्याचे कुटुंबीय झिम्बाब्वेला स्थलांतरीत झाले होते. इथेच सिकंदर रझाच्या क्रिकेट कारकिर्दिला वाव मिळाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.