
SL vs PAK : संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी पीसीबी आले धावून
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) श्रीलंकेत अराजक (Sri Lanka Crisis) परिस्थिती असताना देखील 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपच्या (Asia Cup 2022) आयोजनासाठी पाठिंबा दर्शवला आहे. श्रीलंकेत जरी सत्ताधाऱ्यांविरोधातील लोकांचा असंतोष हा रस्त्यावर दिसत असला तरी यामुळे क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सुरक्षेच्या दृष्टीकोणातून कोणती बाधा आल्याचे दिसत नाही.
नुकताच ऑस्ट्रेलियाने आपला श्रीलंका दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. दरम्यान, आर्थिक स्थिती बिकट होत असताना श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटबाया राजबक्षे देश सोडून पळून गेले आहेत. अशा परिस्थितीतही पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आला आहे.
हेही वाचा: Virat Kohli : बाबर आझमच्या ट्विटवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दरम्यान, पीसीबीमधील एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आश्वस्त केले आहे की 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया कपसाठी पाकिस्तान पाठिंबा देईल.
सूत्रांनी सांगितले की, 'पीसीबी अध्यक्षांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांना आश्वस्त केले आहे. पाकिस्तानला वाटते की श्रीलंकेनेच आशिया कपचे आयोजन करावे. कारण यामुळे पर्यटन वाढेल आणि आयोजक देशाच्या महसूलात देखील वाढ होईल.' पाकिस्तानने श्रीलंकेला देशात आराजक स्थिती असतानाही त्यांचा संघ गॉल आणि कोलंबो येथे आपला कसोटी सामना खेळले.
हेही वाचा: Virat Kohli : विराटबाबत कपिल देव नरमले; म्हणतात अजून बरच क्रिकेट बाकी
मिळालेल्या माहितीनुसार आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) सध्या तरी कोणतीच बैठक प्रस्तावित नाही आङे. मात्र येत्या 22 ऑगस्टला बर्मिंगहममध्ये ICC च्या बैठकीत ACC चे सर्व सदस्य उपस्थित असतील. या दरम्यान पुढच्या आशिया कपचे आयोजक पद पाकिस्तानला देण्याबाबत चर्चा केली जाईल.
Web Title: Pakistan Cricket Board Chairmen Ramiz Raja Assure Sri Lanka Cricket For Supporting Organize Asia Cup 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..