अखेर सर्फराजची कर्णधारपदावरून हकालपट्टी

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने कर्णधार सर्फराज अहमदची हकालपट्टी करण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. एका अहवालानुसार मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेटमंडळ कर्णधारपदासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.

कराची : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने कर्णधार सर्फराज अहमदची हकालपट्टी करण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. एका अहवालानुसार मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेटमंडळ कर्णधारपदासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.

पुढील महिन्याच्या सुरवातीसच होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब बोईल. सर्फराज कर्णधार म्हणून 13 कसोटीत केवळ चार सामनेच जिंकू शकला आहे. नवा कर्णधार म्हणून 29 वर्षीय शान मसूद याचे नाव पुढे येत आहे. त्याने आतापर्यंत 15 कसोटीत 793 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्याने त्याचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Cricket Board decides to relieve Sarfaraz Ahmed of Pakistan Test captaincy