esakal | मिस्बाह-वकार युनिस पळपुटे! रावळपिंडी एक्स्प्रेसचा खतरनाक बाउन्सर
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Cricket

मिस्बाह-वकार युनिस पळपुटे! रावळपिंडी एक्स्प्रेसचा खतरनाक बाउन्सर

sakal_logo
By
सुशांत जाधव

युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये वेगळाच खेळ सुरु झाल्याचे दिसते. वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा होताच तासाभरात संघाचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यात आता माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने उडी घेतली. मिस्बाह आणि वकार युनिस यांना पळकुटे म्हणत या दोघांच्या राजीनाम्याचा संदर्भ थेट तालिबान आणि अमेरिका सैन्याशी जोडला आहे.

तालिबान आणि अमेरिकन सैन्याशी तुलना

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे ही माजी क्रिकेटर रमीझ राजा यांच्या हाती आली आहेत. पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर ते मार्गदर्शकांची चांगलीच शाळा घेतील. याची धास्ती असल्यामुळेच दोघांनी पळ काढला आहे, असा आरोप अख्तरने पाकिस्तानच्या दोन्ही माजी सहकाऱ्यांवर केला आहे.

हेही वाचा: ICC WTC Points Table : पाक आठवड्याभराचा पाहुणा; टीम इंडिया टॉपला

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने या दोघांसदर्भात मोठे वक्तव्य केले. अख्तर म्हणाला की, मिस्बाह उल हक आणि वकार युनिस यांचा राजीनामा म्हणजे अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आल्यानंतर अमेरिकन सैन्याने पळ काढण्यातल्या प्रकार वाटतो. राजा आपल्या चुकांवर पांघरुन घालणार नाहीत, याची भिती असल्यामुळेच त्यांनी पळ काढला आहे, असे अख्तरने म्हटले आहे.

मिस्बाह उल हक याने राजीनामा देताना 'बायो-बबल' आणि पाकिस्तान क्रिकेटचा व्यस्त वेळापत्रकाचे कारण सांगितले होते. मात्र अख्तरने त्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. दोघांनी राजीनामा देऊन स्वत: आपल्यातील उणीवर जगासमोर आणली आहे. पळून जाण्यापेक्षा त्यांनी संघासोबत रहायला हवे होते, असे मतही अख्तरने व्यक्त केले आहे.

पाकिस्तानच्या दोन दिग्गजांनी राजीनामा दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रझाक या दोघांना तात्पुरत्या स्वरुपात मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. ही दोघ पाकिस्तान दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत संघाला मार्गदर्शन करतील. वर्ल्ड कपला जाताना पाकिस्तानला याच प्रशिक्षकांसोबत जावे लागणार की त्यांना नवा प्रशिक्षक मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top