Rohit vs Virat | एकेकाळी होता विराटचा लाडका; रोहित आल्यावर करियर झालं उद्ध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकेकाळी होता विराटचा लाडका; रोहित आल्यावर करियर झालं उद्ध्वस्त

'हिटमॅन'ला नवी जबाबदारी मिळाल्याने त्या खेळाडूची संघात येण्याची उरलीसुरली आशाही संपली

एकेकाळी होता विराटचा लाडका; रोहित आल्यावर करियर झालं उद्ध्वस्त

नवी दिल्ली: रोहित शर्मा सध्याच्या घडीला भारतीय संघाचा एक अप्रतिम सलामीवीर आहे यात वादच नाही. विराटच्या राजीनाम्यानंतर आता रोहितच्या हाती संघाचे नेतृत्व आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रोहितने सलामीवीर या शब्दाची परिभाषाच बदलली आहे. केवळ वन डे किंवा टी२० नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्येही आता रोहितने यशस्वीपणे आपला सलामीवीर म्हणून ठसा उमटवला आहे. रोहितने आता तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली सलामीवीर म्हणून जागा पक्की केली आहे. पण रोहित आल्यानंतर आता विराटचा एकेकाळचा लाडका फलंदाजाचे करियर मात्र जवळपास संपुष्टातच आलं.

हेही वाचा: अनुष्कानं शेअर केला ग्रीन बिकिनीतला फोटो, विराट झाला रोमँटिक

या खेळाडूचं करियर संपल्यातच जमा

भारतीय टेस्ट संघाचा सलामीवीर मुलरी विजय हा एकेकाळी संघाचा अतिशय भरवशाचा सलामीवीर होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुरली विजयला संधीच मिळालेली नाही. डिसेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध मुरली विजयने शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर मयंक अग्रवालने त्याची जागा घेतली. पण त्यानंतर रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संघात घेण्यात आले आणि मग रोहितने मागे वळून पाहिलंच नाही. रोहितच्या येण्यानंतर मुरली विजयची उरलीसुरली आशादेखील संपली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुरली विजयला आता संधी मिळणं खूपच कठीण असल्याने तो देशांतर्गत क्रीडा स्पर्धांमध्येही फारसा अँक्टीव्ह असल्याचं दिसत नाही.

हेही वाचा: विराटपेक्षा भारी ठरतोय रोहित, दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा दिसली झलक

Virat-Kohli-Murali-Vijay

Virat-Kohli-Murali-Vijay

मुरली विजयची कारकीर्द

मुरली विजयने कसोटी क्रिकेटमध्ये ६१ सामने खेळले असून त्यात ३ हजार ९८२ धावा केल्या आहेत. त्याच्या या कारकिर्दीत त्याने १२ शतकं ठोकली आहेत. वन डे आणि टी२० मध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. जेव्हा संधी मिळाली तेव्हादेखील त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. गेल्या ३ वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. सध्याचा रोहित-राहुल जोडीचा फॉर्म पाहता मुरली विजयच नव्हे तर कोणत्याही सलामीवीराला आता संधी मिळणंच कठीण आहे.

Rohit-Sharma

Rohit-Sharma

रोहित सलामीवीर म्हणून सर्वोत्तम

रोहित शर्मा सध्या उत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. वन डे आणि टी२० क्रिकेटमध्ये रोहितने अनेक विक्रम रचले आङेत. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवून दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात त्याच्या नावे एकही शतक नव्हतं पण २०२१मध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर त्याने तेदेखील केलं. टी२० संघाचा तर रोहित आता कर्णधार आहे. याशिवाय, वन डे क्रिकेटमध्ये रोहितच्या नावे ३ द्विशतकं आहेत. सध्या खेळणाऱ्या खेळाडूंपैकी कोणी या विक्रमाच्या आसपासही नाही.

loading image
go to top