यासिर शाह विरुद्धच्या बलात्कार प्रकरणाचा लागला 'निकाल' | Yasir Shah Minor Girl Rape Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yasir Shah Rape allegation
यासिर शाह विरुद्धच्या बलात्कार प्रकरणाचा लागला 'निकाल'

यासिर शाह विरुद्धच्या बलात्कार प्रकरणाचा लागला 'निकाल'

इस्लामाबाद : पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाह (Yasir Shah) याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या बलात्कार (Minor Girl Rape Case) प्रकरणात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणात यासिर शाहचे नाव हे चुकून आले होते त्यामुळे त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे. (Yasir Shah Minor Girl Rape Case)

इस्लामाबादच्या शालिमार पोलीस ठाण्यात बलात्कार पीडितेच्या काकूने एफआयआर दाखल केली होती. या एफआयआरमध्ये यासिर शाह आणि त्याचा मित्र फरहान यांच्यावर चाईल्ड पॉर्नोग्राफी (Child Pornography) आणि बलात्काराची कलमे लावली होती.

हेही वाचा: चूक झाली! अखेर जोकोविचने कबूल केले

दरम्यान, इस्लामाबाद पोलिसांनी या एफआयआरमधून यासिर शाहचे नाव वगळल्याची माहिती दिली. त्याने नाव चुकून समाविष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस म्हणाले, या बलात्कार प्रकरणाशी यासिर शाहचा कोणताच संबंध नाही. पीडितेने चुकून यासिर शाहचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट केल्याचे मान्य केले आहे.' (Yasir Shah Name Dropped from Rape Case FIR)

हेही वाचा: 'Tata IPL' मुळे बीसीसीआयला मिळणार ११२४ कोटी

हे प्रकरण २०२० मधले आहे. एका अल्पवयीन मुलीने फारहानने तिच्यावर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केला. याचबरोबर या घटनेचा व्हिडिओही तयार करुन तिला धमकी देण्यात आल्याचा आरोपही पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीत यासिर शाहने आपल्या मित्राला फरहानला मदत केली असल्याचा उल्लेख होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanCricketrape news
loading image
go to top