T20WC22 Point Table : ... तर भारताऐवजी पाकिस्तान जाणार सेमी फायनलमध्ये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20World Cup 2022 Group 2 Point Table

T20WC22 Point Table : ... तर भारताऐवजी पाकिस्तान जाणार सेमी फायनलमध्ये?

T20World Cup 2022 Group 2 Point Table : पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. याचबरोबर पाकिस्तानने नेट रनरेट देखील सुधारले असून यामुळे आता भारतीय संघावर दबाव वाढला आहे. पाकिस्तान अजूनही सेमी फायनलच्या रेसमध्ये असून जर नेदरलँड आणि झिम्बाब्वे संघाने काही चमत्कार केला तर पाकिस्तानची चांदी होण्याची शक्यता आहे. भारताचा 6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरूद्ध सामना होणार आहे.

हेही वाचा: PAK vs SA : पाऊस आफ्रिकेला नाही पावला! पाकची पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप

पाकिस्तानने आज दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर उडी घेतली. याचबरोबर त्यांचे नेट रनरेट देखील +1.085 झाले आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानचे रनरेट हे भारताच्या (+0.730) तुलनेत चांगले आहे. भारत सध्या 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा: Umesh Yadav : मला फसवू शकता मात्र देव सगळं पाहतोय लक्षात ठेवा! वेगवान गोलंदाजांचा निवडसमितीला बाऊन्सर

आता ग्रुप 2 मधील प्रत्येक संघाचे 4 सामने झाले असून अजून एक सामना शिल्लक आहे. नेदरलँड आणि झिम्बाब्वे जवळपास सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर गेले आहेत. मात्र भारत, दक्षिण आफ्रिका तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशलाही सेमी फायनल गाठण्याची संधी आहे.

भारताला झिम्बाब्वेला हलक्यात घेऊन चालणार नाही

जर भारताचा विचार केला तर भारताच्या दृष्टीकोणातून झिम्बाब्वेचा सामना जिंकणे खूप गरजेचे आहे. कारण आजच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला मात देऊन आपले रनरेट देखील सुधारले आहे. जर भारत हा सामना हरला आणि पाकिस्तानने बांगलादेशला मात देत दोन गुणांची कमाई केली तर भारत आणि पाकिस्तान समान 6 गुणांवर येतील आणि सरस रनरेटच्या जोरावर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचेल. याच परिस्थितीत जर दक्षिण आफ्रिका नेदरलँडकडून पराभूत झाली तर मात्र पाकिस्तान आणि भारत सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता आहे

हेही वाचा: Pak Actor Shinwari : काही करुन भारताला हरवा, एका पायावर लग्नाला तयार! पाकिस्तानी अभिनेत्रीचं चँलेज

बांगलादेशलाही संधी मात्र..

टी 20 वर्ल्डकप 2022 च्या ग्रुप 2 मधील गुणतालिका ग्रुप 1 प्रमाणेच क्लिष्ट झाली आहे. जर बांगलादेशने पाकिस्तानला हरवलं आणि तिकडं नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं (शक्यता कमी) तर बांगलादेश 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहचले. अशा परिस्थितीत बांगलादेश भारतासोबत सेमी फायनलसाठी पात्र ठरू शकते.