PAK vs SA : पाऊस आफ्रिकेला नाही पावला! पाकची पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PAK vs SA : पाऊस आफ्रिकेला नाही पावला! पाकची पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप

PAK vs SA : पाऊस आफ्रिकेला नाही पावला! पाकची पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप

Pakistan Defeat South Africa : पाकिस्तानने पावसाच्या व्यत्यानंतरही सामन्यावरील आपली पकड सुटू दिली नाही. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव करत 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 185 धावा केल्या होत्या. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डीएलएसनुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 14 षटकात 142 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र आफ्रिकेला 14 षटकात 9 बाद 108 धावांपर्यंतच मजल मारता आली.

हेही वाचा: Umesh Yadav : मला फसवू शकता मात्र देव सगळं पाहतोय लक्षात ठेवा! वेगवान गोलंदाजांचा निवडसमितीला बाऊन्सर

पाकिस्तानसाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात पाकिस्तानने खराब सुरूवातीनंतर 185 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दमदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेची अवस्था 9 षटकात 4 बाद 69 धावा अशी केली आहे. मात्र भारत - बांगलादेश सामन्याप्रमाणे आजच्या सामन्यातही दुसऱ्या डावाची पाच षटके उलटून गेल्यानंतर पावसाने व्यत्यय आणाला. त्यामुळे डकवर्थ लुईसचा खेळ पुन्हा एकदा खेळला गेला.

हेही वाचा: Pak Actor Shinwari : काही करुन भारताला हरवा, एका पायावर लग्नाला तयार! पाकिस्तानी अभिनेत्रीचं चँलेज

डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे दक्षिण आफ्रिका 15 धावांनी पिछाडीवर होती. डकवर्थ लुईस मेथर्डनुसार 9 षटाकात 84 धावा करणे आवश्यक होत्या. आफ्रिकेच्या फक्त 69 धावा झाल्या होत्या. त्यामुळे ते 15 धावांनी पिछाडीवर होते. दरम्यान, पावसाने उसंत घेतली आणि डीएलएस नुसार सामना 14 षटकांचा करण्यात आला. त्यानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 142 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. आफ्रिकेने 9 षटकात 69 धावा केल्या असल्याने त्यांना 5 षटकात विजयासाठी 73 धावांची गरज होती.