

Mohammad Amir Join MI
ESakal
इंग्लंडमधील 'द हंड्रेड लीग'चा २०२६ चा हंगाम २१ जुलै रोजी सुरू होणार आहे. या हंगामाच्या आधी एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर एमआय लंडन संघात सामील झाला आहे. एका ट्विटमुळे चर्चा सुरू झाली आहे. वृत्तानुसार, अमीर आगामी हंगामात एमआय संघाकडून खेळेल. अबरार अहमदच्या पाठोपाठ, मोहम्मद अमीर हा आयपीएल फ्रँचायझीने करारबद्ध केलेला दुसरा पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे.