Shaheen Afridi : हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला शाहीन म्हणतो 'दुआ में याद रखना!' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaheen Afridi

Shaheen Afridi : हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला शाहीन म्हणतो 'दुआ में याद रखना!'

Shaheen Afridi : ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये इंग्लंडने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीची दुखापत या सामन्यात टर्निंग पॉइंट ठरली. खरं तर, हॅरी ब्रूकचा झेल टिपताना शाहीनच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला त्याची षटकेही पूर्ण करता आली नाहीत.

हेही वाचा: Suryakumar Yadav : 32 चेंडूत अर्धशतक, पुढच्या 17 चेंडूत शतक! सूर्याच्या स्वागताचा VIDEO व्हायरल

टी-20 विश्वचषकापूर्वीच श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान शाहीनला दुखापत झाली होती. दुखापतमुळे तो आशिया कपमधून बाहेर पडला. टी-20 विश्वचषकात त्याने दमदार पुनरागमन केले. फायनल मध्ये त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. यांनतर नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे.

शाहीन आफ्रिदीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला अॅपेन्डेक्टॉमी झाला होता. अल्लाहच्या कृपेने मी आता बरा आहे.