ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची बायको पाकिस्तानी खेळाडूवर फिदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Hasnain And Erin Holland

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची बायको पाकिस्तानी खेळाडूवर फिदा

Sydney Thunder vs Adelaide Strikers, 32nd Match: बिग बॅश लीग 2021-22 (BBL 2021-22) हंगामात पाकिस्तानी जलदगती गोलंदाज मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) याने कमालीचे पदार्पण केले. बीबीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात त्याने 3 विकेट घेतल्या. एडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) विरुद्धच्या सामन्यात हसनैन याने सिडनी थंडर (Sydney Thunder) कडून बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले.

हसनैन याने डावातील तिसऱ्या आणि आपल्या वैयक्तिक तिसऱ्या षटकात आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. आपल्या पहिल्या ओव्हरमधील दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर त्याने विकेट घेतल्या. 4 चेंडूत 3 विकेट घेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: VIDEO : कोहलीची बाउंड्री बाहेरुन कॅप्टन्सी; Live मॅचमधील खास झलक

त्याच्या दमदार पदार्पणावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन कटिंगची पत्नी आणि मॉडेल Erin Holland देखील फिदा झालीये. एरिन हॉलँड (Erin Holland) हिने ट्विटच्यामाध्यमातून पाकिस्तानी गोलंदाजावर कौतुकाचा वर्षाव केलाय. 'जबरदस्त, मोहम्मद हसनैन. पाकिस्तानी गोलंदाजाची BBL मध्ये धमाकेदार एन्ट्री असा उल्लेख करत तिने खास ट्विट केले आहे. तिचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेक रिअ‍ॅक्शन उमटत आहेत.

हेही वाचा: पंतच्या वादग्रस्त कॅचवर गावसकरांची 'कडक' रिअ‍ॅक्शन

हसनैन याने अविस्मरणीय षटकात मॅथ्यू शॉर्ट, जेक वेदराल्ड आणि जोनाथन वेल्स यांची विकेट घेतली. एकही धाव न खर्च करता या तिघांना त्याने तंबूत धाडले. सिडनी थंडरने निर्धारित 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना एडिलेड स्ट्रायकर्सनं 20 षटकात 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांना 28 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

कोण आहे बेन कटिंगची पत्नी

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू बेन कटिंग यांची पत्नी एरिन ही माजी विश्वसुंदरी आहे. 7 क्रिकेट, आयपीएल पीसीएल या स्पर्धेत ती प्रेंझेंटेशच्या भूमिकेतही दिसते. फेब्रुवारी 2021 मध्ये बेन कटिंग आणि एरिन यांचा विवाह पार पडला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top