VIDEO : कोहलीची बाउंड्री बाहेरुन कॅप्टन्सी; Live मॅचमधील खास झलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Viral Video

VIDEO : कोहलीची बाउंड्री बाहेरुन कॅप्टन्सी; Live मॅचमधील खास झलक

SA vs IND : भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकला आहे. विराट कोहली (Virat Kohli) पाठिच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नसला तरी तो संघाला इनपुट पुरवताना दिसतोय. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कोहली सीमारेषेबाहेरुन जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीसोबत (Mohammed Shami) चर्चा करताना दिसते.

भारतीय संघाने पहिल्या डावात 202 धावा केल्या. यात कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या लोकेश राहुलने 50 धावा केल्या तर अश्विनने 46 धावांची खेळी केली. विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीची शंभरी करण्याची सुवर्ण संधी होती. पण दुसरा सामना मुकल्यामुळे त्याचे हे शतक लांबणीवर पडले आहे. कोहलीला त्याचे चाहते मिस करत आहेत. कोहलीशिवाय मॅच पाहण्यात काहीच मजा नाही, असे आशयाच्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे.

हेही वाचा: RSAvsIND Live: शार्दुलची 'सात'; अल्प आघाडीसह आफ्रिकेचा खेळ खल्लास

कोहलीची उणीव जाणवणाऱ्या चाहत्यांसाठी सामन्यादम्यान कोहलीची कमालीची झलक दिसली. भारतीय संघाच्या बॅटिंगवेळी ड्रेसिंग रुममध्ये बसेलेला कोहली फिल्डिंगवेळी चक्क सीमाषेवर येऊन संघातील खेळाडूंना इनपूट देताना दिसला. शमीसोबतचा त्याच्या जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात कोहली फिल्ड प्लेसमेंटवरुन काहीतरी चर्चा करताना दिसते. त्याचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावताना दिसतोय.

हेही वाचा: 'ये हात मुझे दे दे ठाकूर'; शार्दुलची 'लॉर्ड' कामगिरी

फलंदाजाच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतापेक्षा तुलनेनं जरा बरी कामगिरी केली. पण शार्दुल ठाकूरच्या माऱ्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. शार्दुलने पाचपेक्षा अधिक विकेट घेत आफ्रिकेच्या संघाला अंकूश लावला. त्याने घेतलेल्या सात विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावांत आटोपला आहे. दक्षिण आफ्रिकेला 27 धावांची अल्प आघाडी मिळाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top