"विराटने खेळाडू म्हणूनच राहावं, कर्णधारपदाच्या मोहात पडू नये" | Virat Kohli Captaincy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Puzzled

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या मताशी तुम्ही सहमत आहात का?

"विराटने खेळाडू म्हणूनच राहावं, कर्णधारपदाच्या मोहात पडू नये"

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी२० वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडलं. त्यामुळे आता रोहित शर्माला संघाचे नेतृत्व देण्यात आले. विराट कोहलीने IPLच्या आधीच भारतीय टी२० संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितलं होतं. पण भारतीय वन डे संघ आणि कसोटी संघाचे कर्णधारपद मात्र विराटकडेच असणार आहे. विराटचा हा विचार मात्र पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनला पटला नाही. त्याने याबद्दल महत्त्वपूर्ण मत व्यक्त केलं.

shahid afridi

shahid afridi

"विराटने आता केवळ खेळाडू म्हणून संघात राहावं. कर्णधारपदाच्या मोहात पडू नये. असं झाल्यास त्याच्यावरचा ताण खूप कमी होईल. तो खूप क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला ताण आणि खेळावरील त्याचा परिणाम याचं गणित नीट माहिती आहे. विराटने माझं मत ऐकलं तर त्याला क्रिकेटचा आणि फलंदाजीचा जास्त आनंद घेता येईल", असा सल्ला आफ्रिदीने दिला.

हेही वाचा: Video: भरमैदानात आफ्रिदीची 'ती' कृती.. भारतीय फॅन्सचा संताप!

"कोणत्याही संघाचं नेतृत्व करणं हे सोपं नसतं. भारत किंवा पाकिस्तानसारख्या देशात क्रिकेटला धर्म मानलं जातं. अशा देशांच्या संघाचं नेतृत्व करणं आणि कर्णधारपद भूषवणं ही सोपी गोष्टी नाही. अशा ठिकाणी जोपर्यंत तुम्ही चांगलं नेतृत्व करता तोपर्यंत फॅन्स तुम्हाला डोक्यावर बसवतात. पण जेव्हा तुमचे निर्णय चुकतात, तेव्हा हेच फॅन्स तुम्हाला शिव्याशाप देतात", असं माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सांगितलं.

हेही वाचा: T20 WC: आफ्रिदी 'टीम इंडिया'ला झेपला नाही- पाकिस्तान कोच

"विराटनंतर रोहित शर्माला कर्णधारपद दिलं जाणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. असा निर्णय घेतला जाणार याची दीर्घकाळापासून चर्चा होती. रोहित शर्मासोबत मी डेक्कन चार्जर्स संघातून खेळलो आहे. तो एक अप्रतिम खेळाडू आहे याची मला कल्पना आहे. फलंदाजी करताना त्याची फटकेबाजी पाहण्यासारखी असते. तो मैदानावर अतिशय शांत असतो. पण गरज पडल्यास त्याचा आक्रमक अंदाजही पाहायला मिळतो. रोहितला कर्णधारपद मिळणारच होतं, यात वाद नाही. पण त्यासोबतच आणखी महत्त्वाचं म्हणजे, त्याला कर्णधारपद मिळायला हवंच होतं हेही तितकंच खरं आहे", असं मतही आफ्रिदीने व्यक्त केलं.

loading image
go to top