T-20 World Cup Pakistan squad : पाकने लंगड्या घोड्यावर लावला डाव; कावऱ्या-बावऱ्यावर 'स्टँडबाय'ची वेळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Team Announced T-20 World Cup

T20 World Cup : पाकने लंगड्या घोड्यावर लावला डाव; कावऱ्या-बावऱ्यावर 'स्टँडबाय'ची वेळ!

Pakistan Team Announced T-20 World Cup 2022 Squad : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा केला आहे. क्रिकेटच्या या महाकुंभासाठी पीसीबीने 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. त्याचबरोबर तीन राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे.

आशिया कप स्पर्धेत बॅटिंगसह फिल्डिंगदरम्यान फखर जमान कावरा बावरा दिसला. सोशल मीडियावर त्याच्या फिल्डिंगवर आणि एकूणच कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. फखर जमानला 15 जणांच्या संघात स्थान मिळाले नाही. मात्र तो राखीव खेळाडू म्हणून संघाशी जोडल्या जाणार आहे. याशिवाय मोहम्मद हरीश आणि शाहनवाज दहानी हेही राखीव खेळाडू म्हणून संघात सहभागी होणार आहेत.

आशिया कपमधून दुखापतीमुळे बाहेर असलेला स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने वर्ल्डकप संघात पुनरागमन केले आहे. याशिवाय इंग्लंड कौंटीमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या शाम मसाडूचाही १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी आसिफ अली, हैदर अली आणि इफ्तिखार अहमद यांनाही टी-20 विश्वचषकासाठी 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तानचा संघ - बाबर आजम ( कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसीफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.