Pak vs Ban : बाबर सेनेला विजयानंतरही बाद फेरीची शाश्‍वती नाही! आज बांगलादेश विरुद्ध कोलकातामध्ये लढत

Pakistan vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023
Pakistan vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023

Pakistan vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023 : पाकिस्तान-बांगलादेश या दोन आशियाई देशांमध्ये आज (ता. ३१) एकदिवसीय विश्‍वकरंडकातील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दोन देश कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तान व बांगलादेश या दोन्ही देशांचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.

Pakistan vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023
Rohit Sharma : गोलंदाजांची कामगिरी अफलातूनच! इंग्लंडवरील विजयानंतर कर्णधार रोहितकडून 'या' खेळाडूचे कौतुक

पाकिस्तानच्या संघाने उर्वरित तीन लढती जिंकल्या अन्‌ इतर निकाल त्यांच्या मनाजोगते लागले, तर मात्र त्यांना उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी मिळू शकते. हे झाले जर-तरचे समीकरण; पण त्याआधी पाकिस्तानला तीनही लढती जिंकाव्या लागणार आहेत. बांगलादेशचा संघ मायदेशात रवाना होण्यापूर्वी उर्वरित लढतींमध्ये विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करील.

विश्‍वकरंडकातील सध्याचा गुणतक्क्ता पाहता भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या चार देशांना उपांत्य फेरीत पोहोचण्याची अधिक संधी आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयानंतरही उपांत्य फेरीत पोहोचण्याची शाश्‍वती असणार नाही. पा

Pakistan vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023
Rohit Sharma : गोलंदाजांची कामगिरी अफलातूनच! इंग्लंडवरील विजयानंतर कर्णधार रोहितकडून 'या' खेळाडूचे कौतुक

किस्तानच्या संघाला नेदरलँड्‌स व श्रीलंका यांच्याविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सलग चार लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्याकडून त्यांची हार झाली आहे. या सततच्या पराभवांमधून बाहेर येत पाकिस्तानचा संघ उद्या कशी कामगिरी करतोय, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

इतिहास पाकच्या बाजूने

पाकिस्तान - बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या एकदिवसीय लढतींच्या निकालावर लक्ष टाकता पाक संघाचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येईल. पाकिस्तानच्या संघाने ३३ लढतींमध्ये विजय मिळवले असून बांगलादेश संघाला पाच लढतींमध्ये विजय मिळवता आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com